agriculture news in marathi, Challenge of 13 lakh 50 thousand farmers farms inspection on bollworm issue | Agrowon

साडेतेरा लाख शेतकऱ्यांची शेतपाहणी करण्याचे आव्हान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या साडेतेरा लाख असून, आतापर्यंत फक्त ५० हजार शेतकऱ्यांच्याच शेताची पाहणी जिल्हास्तरीय समित्यांना करता आलेली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केव्हा करायची तसेच भरपाई मिळवून देण्यासाठी कायदेशीररीत्या सुरू झालेली महासुनावणी केव्हा संपणार, या प्रश्नाने कृषी खात्याला हैराण केले आहे.

पुणे : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या साडेतेरा लाख असून, आतापर्यंत फक्त ५० हजार शेतकऱ्यांच्याच शेताची पाहणी जिल्हास्तरीय समित्यांना करता आलेली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केव्हा करायची तसेच भरपाई मिळवून देण्यासाठी कायदेशीररीत्या सुरू झालेली महासुनावणी केव्हा संपणार, या प्रश्नाने कृषी खात्याला हैराण केले आहे.

"बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सरसकट मदत करण्याचे धोरण ठेवण्याची गरज होती. नैसर्गिक आपत्ती समजून तत्काळ कमी-जास्त मदत जाहीर करून या विषयावर पदडा टाकण्याची आवश्यकता होती. मात्र, शासनाने कायदेशीर बाबींचा अवलंब केल्यामुळे कृषी खात्याचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. साडेतेरा लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त ५० हजार शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी झाली आहे. उर्वरित १३ लाख शेतकऱ्यांकडे कधी जायचे आणि केव्हा सुनावणी पूर्ण करायची, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे मराठवाड्यातील कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ मधील कलम १२ (७) नुसार जिल्हास्तरीय समित्या भरपाई अहवाल तयार करीत आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष शेतपाहणी बंधनकारक आहे. यासाठी पाहणी समितीचे अध्यक्षपद संबंधित जिल्ह्याचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला देण्यात आले आहे. झेडपीचा कृषी विकास अधिकारी, विद्यापीठाचा कापूस शास्त्रज्ञ आणि संबंधित तालुक्याचा तालुका कृषी अधिकारी या समितीचा सदस्य असून जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सदस्य सचिव आहेत.

उटारेटीनंतरही मदतीबाबत साशंक : कृषी अधिकारी
कागदपत्रे खरडून, शेताची पाहणी करून कष्टपूर्वक तयार होणाऱ्या अहवालांना कंपन्याही नाकारीत आहेत. त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहे. अर्थात या सर्व उटारेटीतून शेतकऱ्यांना खरोखर मदत मिळणार का याविषयीदेखील आम्ही साशंक आहोत, अशी कबुली विदर्भातील एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने दिली.

महासुनावणीच्या कामाकडे आमचे लक्ष : कंपन्या
कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आमच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ मधील तरतुदींचा घाईघाईने वापर केला जात आहे. मात्र, कृषी खात्याचे अधिकारी अनेक गंभीर चुका करीत आहेत. महासुनावणीसाठी सादर होत असलेल्या सर्व कागदपत्रांवर आमचे लक्ष आहे. चुकीच्या बाबी आम्ही अपिलात थेट न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न करू, असेही एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

बोंड अळीबाबत जिल्हास्तरीय समित्यांनी केलेल्या पाहणीची सद्यस्थिती
विभाग तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या समितीने पाहणी केलेल्या तक्रारी
नाशिक सव्वातीन लाख चार हजार
पुणे एक लाख ५५
औरंगाबाद सव्वाचार लाख १७ हजार
 
लातूर अडीच लाख १७ हजार ५००
अमरावती अडीच लाख साडेसात हजार
नागपूर ६१ हजार साडेतीन हजार 

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...