agriculture news in Marathi, chana sowing less by 33 percent, Maharashtra | Agrowon

हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारली
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.

नवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम हरभरा पेरणीवर झाला आहे. देशात हरभरा पेरणीकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २७.१ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ६७.१ टक्के पेरणी झाली असून, ३२.९ टक्क्यांनी पेरा माघरला आहे.

देशात यंदा हरभऱ्याचा पेरा गेल्या पाच वर्षांतील याच काळात पेरणी होणऱ्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेतही घसरला आहे. पाच वर्षांतील पेरणीची सरसरी ही २८.३ लाख हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा २७.१ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने हरभरा पेरणी घटली आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांमध्ये हरभरा पेरणी घटल्याने त्याचा परिणाम देशातील पेरणीवर झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक पट्ट्यात दुष्काळ असल्याने दोन्ही राज्यांतील पेरणीत मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच कर्नाटक सरकारनेही २४ जिल्ह्यातील १०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 

कर्नाटक, महाराष्ट्रात पेरणीत मोठी घट 
कर्नाटक राज्यात हरभरा पेरणीने पन्नाशीही गाठली नाही. कर्नाटकात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी पेरा घटला आहे. तसेच यंदा महाराष्ट्रात केवळ २ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, ४४.३ टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षेत्र घटले आहे. उत्तर प्रदेशात २ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.७ टक्के कमी पेरणी झाली आहे. तर मध्य प्रदेशात २५.४ टक्क्यांनी पेरणीत घट होऊन १० लाख हेक्टरवर पेरा झाला आहे.  

पेरण्या रखडल्या
गेल्या वर्षी हरभरा दरात झालेली घसरण आणि शासकीय खरेदीतील गोंधळ यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीकडे पाठ फिरविली आहे. तसेच देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी स्थिती असल्याने पेरणीवर परिणाम झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा नसल्याने रब्बी पेरणी रखडली आहे. त्याचा परिणाम एकूण देशातील हरभरा पेरणीवर झाला. मोठा कोरडा काळ किंवा दुष्काळी स्थिती पिकासाठी पोषक नाही, तसेच यंदाच्या हंगामात पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.  

 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...