agriculture news in marathi, Chandrabhagate mishteyay melamite sewage | Agrowon

चंद्रभागेत मिसळतेय मैलामिश्रित सांडपाणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 जुलै 2018

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातून येणारे गटारीचे पाणी थेट चंद्रभागेत येते. याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना केल्या आहेत. घाण पाणी त्वरित थांबवावे; अन्यथा वारकरी सेवा महासंघाच्या वतीने आंदोलन केले जाईल.
- ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड, प्रदेश सचिव, वारकरी सेवा महासंघ

चंद्रभागा आणि पंढरपूरच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. तरीही घाण पाण्यात भाविकांना स्नान करावे लागते. हे विठ्ठल भक्तांचे दुर्दैव म्हणावे लागेल. - बळिराम तांबेकर, भाविक, कागल, जि. कोल्हापूर

शहरातील घाण पाणी वाहून जाण्यासाठी नदीकाठच्या भागात ड्रेनेज करण्यात आले आहे. कुंभार घाटाजवळ गटारीचे पाणी साठवण्यासाठी मोठा खड्डा आहे. त्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून अन्य ठिकाणी सोडले जाते. पावसाचे पाणी नदीपात्रात गेले होते. तेही तत्काळ बंद केले.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर

पंढरपूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील मैलामिश्रित पाणी आजही चंद्रभागेत मिसळत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

चंद्रभागा नदीतील जलशुद्धीकरणासाठी राज्य सरकारने गंगा नदीच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा ही योजना जाहीर केली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र, शुद्धीकरणासाठी दोन वर्षांमध्ये एक रुपयादेखील खर्च केला नाही. ही योजना आजही कागदावरच आहे. यात्रा आली, की योजनेची चर्चा सुरू होते. आजही शहरातील गटारातून वाहून जाणारे मैलामिश्रित पाणी चंद्रभागा नदीपात्रात मिसळले जाते.

प्रदूषित नदीपात्र
चंद्रभागा नदीपात्राच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, असे न्यायालयाचे निर्देश असतानादेखील स्थानिक प्रशासनाकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारानंतर समोर आले आहे. घाण पाण्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरूप आल्याने तिचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...