चंद्रकांत दळवी देणार सरपंचांच्या प्रश्‍नांची उत्तरे

चंद्रकांत दळवी देणार सरपंचांच्या प्रश्‍नांची उत्तरे
चंद्रकांत दळवी देणार सरपंचांच्या प्रश्‍नांची उत्तरे

पुणे ः सकाळ-ॲग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेत मार्गदर्शन करताना पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सरपंचांना कामे करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्या सरपंचांना ग्रामविकास किंवा प्रशासकीय अडचणींबाबत प्रश्‍न विचारायचे असतील त्यांनी ते ‘ॲग्रोवन’कडे पाठवायचे आहेत. ‘ॲग्रोवन’मध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ग्रामविकासाच्या सदरामध्ये या प्रश्‍नांची उत्तरे स्वतः श्री. दळवी देणार आहेत.  आपले निढळ हे गाव विकासाभिमुख आणि समृद्ध कसे केले याबाबत श्री. दळवी यांनी शुक्रवारी केलेले अनुभवकथन महापरिषदेत उपस्थित सरपंचांना खूपच भावले. सरपंचांनी आपल्या गावातील समस्यांचा पाढाच नंतर श्री. दळवी यांच्याशी संवाद साधताना वाचला. अनेक प्रश्‍नांची उत्तरे देताना या समस्यांवर मात करून पुढे कसे जायचे याचे मार्गर्शन त्यांनी केले. त्याचबरोबर उर्वरीत प्रश्‍नांची उत्तरे ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून देण्याची ग्वाही त्यांनी सरपंचांना दिली. त्याचबरोबर गावाचे, ग्रामविकासाबाबतचे प्रश्‍न विचारावेत, व्यक्तिगत प्रश्‍न विचारू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.   सरपंचांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी श्री. दळवी यांना विचारावयाचे प्रश्‍न आपले नाव, गाव, जिल्हा व मोबाईल नंबरसह पुढील पत्त्यावर पाठवावेत. दर गुरुवारी या प्रश्‍नांना उत्तरे दिली जातील. ॲग्रोवन, सकाळ मीडिया प्रायव्हेट लि., ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२, फॅक्‍स - ०२०-२४४०५७५८ किंवा ई मेल - agrowon@esakal.com   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com