agriculture news in marathi, Chandrakant Dalvi retires on 31 march | Agrowon

चंद्रकांत दळवी महिना अखेरीस निवृत्त होणार
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ग्रामविकास क्षेत्रात काम करणार
- चंद्रकांत दळवी

मुंबई : पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ग्रामविकास क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी "सरकारनामा"शी बोलताना सांगितले. 

सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजना कल्पकतेने राबविणारे अधिकारी म्हणून दळवी यांनी नालौकीक संपादन केला आहे. दळवी यांनी राबविलेल्या "झिरो पेंडन्सी" या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले होते. हा उपक्रम राज्यभरात सर्व कार्यालयांमध्ये राबवावा असे आदेश मुख्य सचिव सुमीत मल्लीक यांनी महिनाभरापूर्वीच काढले आहेत. जमाबंदी आयुक्त म्हणून कार्यरत असताना दळवी यांनी सात बारा, जमिनींची मोजणी, नकाशे याबाबत अनेक नाविन्यूपर्ण निर्णय घेतले होते. सातबारा ऑनलाईन करण्याचा निर्णयही दळवी यांनीच घेतला होता. 

आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना संत गाडेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. ही योजनाही दळवी यांच्याच संकल्पनेतून उतरली होती.

नगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी शाळकरी मुलांची प्रगती साधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. 

दळवी यांनी त्यांच्या निढळ (जि. सातारा) या गावाचा पूर्ण कायापालट केला आहे. जलसंधारण, कृषी, ग्राम विकास, दुग्ध विकास, गावक-यांची आर्थिक उन्नती, शिक्षण अशी चौफेर प्रगती त्यांनी निढळमध्ये केली आहे. त्यामुळेच राज्यातील मोजक्‍या आदर्श गावांमध्ये निढळचाही उल्लेख होतो. निवृत्तीनंतर राज्य पातळीवर गावांच्या विकासासाठी कामे करण्यावर भर देणार असल्याचे दळवी यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...