जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.
श्री. पाटील यांच्या हस्ते आज (ता. १९) पहाटे अडीच वाजता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेगाणे (राहणार मळगे बुद्रुक तालुका कागल ) यांना मिळाला.
योगायोगाने श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा सुरू असतानाच पंढरपूर परिसरात पावसाचे आगमन झाले. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात जमलेल्या सुमारे सहा लाखाहून अधिक वारकरी हरिनामाचा जयघोष करीत असताना रिमझिम पाऊस पडत होता.
श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या महापूजेनंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात श्री पाटील व सौ. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी म्हणून महा पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या मेंगाणे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सौ. दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम ह-भ-प शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे ,अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले राज्यात यंदा खूप तीव्र दुष्काळ पडला आहे या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्या चा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकात मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती दिली .मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्याला...
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील श्री मेंगाणे गेली पंचवीस वर्षे पंढरीची वारी करतात. शेती करणाऱ्या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटी महामंडळाच्या वतीने एक वर्ष मोफत प्रवासाचा पास श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
विशेष सत्कार...
पंढरपूर येथील प्रांताधिकारी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर समितीच्या अनेक कामांना चालना दिली आहे. भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी केलेल्या सूचनांची तात्काळ कार्यवाही करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार महसूल मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
- 1 of 566
- ››