agriculture news in marathi, chandrakant patil says, government serious on drought, Maharashtra | Agrowon

सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाय, उपाययोजनाबाबत सरकार काम करतेय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे महसूल व पुनर्वसन व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाय, उपाययोजनाबाबत सरकार काम करतेय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे महसूल व पुनर्वसन व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात होत असलेल्या चारदिवसीय ‘किसान आधार’ संमेलनाचे सोमवारी (ता.१५) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, कुलगुरू डाॅ. के. पी. विश्वनाथा, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, खासदार दिलीप गांधी, 

आमदार शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, की सरकार शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करतेय. २०२२ पर्यंत शेतीची उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. धान्याचा मुबलक साठा असला, तरी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे दिसतेय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वनविभागात चारा घेतला जाणार आहे. पाण्यावर अनुदान देण्याचाही सरकारचा प्रयत्न असेल. सरकार संकटकाळी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. विद्यापीठाचे संशोधन शेतकरी विकासाला मदत करणारे आहे. 

या वेळी राम शिंदे, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, शालिनी विखे पाटील, संजय धोत्रे, खासदार दिलीप गांधी यांची भाषणे झाली.

प्रारंभी कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी प्रास्ताविक करून आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २५७ वाण व ३४ विविध औजारे विकसित केले आहे. शिवाय १४०० शिफारसी केल्या आहेत. गतवर्षी संमेलनाला ८० हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत, असे सांगून विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली. 
डाॅ. आनंद सोळंके यांनी सूत्रसंचालन केले. 

मालदांडीला प्राधान्य द्या!
राज्यातील बहुतांश भागात मालदांडी या ज्वारीच्या वाणाला पसंती असते. त्याला अजून आपन १९३५ पासून पर्याय देऊ शकलो नाही. खायला रुचकर असलेल्या मालदांडी ज्वारीच्या वाणाला प्राधान द्या. त्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा, त्यात संशोधन व्हावे, असे आवाहन करीत कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी मालदांडी ज्वारीचे कौतुक केले.
 

इतर अॅग्रो विशेष
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...