agriculture news in Marathi, Chandrakant Patil says, need of gave reputation to farmers, Maharashtra | Agrowon

मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज : चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘अॅग्रोवन’चा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात शनिवारी (ता. २७) झाले. त्या वेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘अॅग्रोवन’चा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात शनिवारी (ता. २७) झाले. त्या वेळी ते बोलत होते.

शेतीच्या दृष्टीने कठीण काळ असताना ‘अॅग्रोवन’ने नेहमीच सकारात्मक पत्रकारिता करून शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असे श्री. पाटील म्हणाले. एक शेतकरी म्हणून मला ‘अॅग्रोवन’विषयी नेहमीच उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी मूळचा शेतकरी आहे. मी दोन वर्षे शेतीत अनेक प्रयोग केलेले आहेत." ‘अॅग्रोवन’ने विविध यशकथांच्या माध्यमातून शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो असा विश्‍वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

अॅग्रोवन दिवाळी अंक प्रकाशनाचा  video

शेतीविषयी विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, यावर श्री. पाटील यांनी भर दिला. ते म्हणाले, की मजुरांची प्रतिष्ठा वाढविणे महत्त्वाचे आहे. आज मजुराला समजा महिन्याला एक लाख रुपये मिळाले तरी त्याला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण आहे. कारण या कामाला प्रतिष्ठा नाही. राज्यातील दुष्काळाच्या बाबतीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सकाळ प्रकाशनाच्या विविध दिवाळी अंकांची माहिती दिली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने यंदा १९ दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येत आहेत. प्रत्येक अंक हा विविध घटकांसाठी व वेगळ्या विषयांचा वेध घेणारा आहे, असे ते म्हणाले.

‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, मजुरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने वागवणे हे या संदर्भात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. ‘अॅग्रोवन’ने दिवाळी अंकाच्या माध्यमातून या मजूर समस्येवर कशी मात करता येईल, याची मांडणी केली आहे. या संदर्भात प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील २६ यशकथा या अंकात आहेत, असे ते म्हणाले.

या वेळी सकाळ कोल्हापूरचे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सकाळचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सेवा भक्तीचे निवासी संपादक निखिल पंडितराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेदव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक सौ. भाग्यश्री फरांदे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत, कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ, तळसंदे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जयवंत जगताप, रामेतीचे नामदेव परीट, शाहू तंत्रमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव, शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, तसेच दिवाळी अंकात ज्यांचा यशकथांचा समावेश आहे. त्यापैकी मिलिंद पाटील, सौ. संजीवनी पाटील, प्रताप चिपळूणकर, राजेंद्र कुलकर्णी, धनाजी गुरव आदी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...