agriculture news in marathi, Chandrapur hottest city in country crosses 46 degree Celsius | Agrowon

‘चंद्र’पूरला तापले; तापमान उच्चांकी ४६.४ अंशांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र होरपळत आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक असल्याने साेमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उंच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र होरपळत आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक असल्याने साेमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उंच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येणार असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने चंद्रपूर येथे सोमवारी देशातील उच्चांकी तापमान नोंदले गेले. २९ एप्रिल २०१३ मध्ये चंद्रपूर येथे एप्रिल महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. २००९ मध्ये आणि गेल्यावर्षी २०१७ मध्ये ४६.४ अंश इतके तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर साेमवारी पुन्हा आतापर्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाचे तापमान नोंदविले गेले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश, मराठवाड्यात २ ते ३ अंशांची वाढ झाली होती.

अंदमान आणि परिसरावर रविवारी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सक्रीय होते. ईशान्य दिशेकडे सरकत जाणारे क्षेत्र हळूहळू निवळणार आहे. बुधवारपर्यंत पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता अाहे. तर रविवारी पश्‍चिम बंगाल, उत्तर ओडिशा दरम्यान ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, नगर ४३.८, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर ३३.२, मालेगाव ४३.०, नाशिक ३८.१, सांगली ३९.५, सातारा ४०.०, सोलापूर ४३.५, मुंबई (सांतक्रूझ) ३३.२, अलिबाग ३५.३, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३३.६, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.७, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४३.८, बुलडाणा ४१.२, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४२.५, नागपूर ४५.२, वर्धा ४५.८, यवतमाळ ४४.०.
-------------
चंद्रपूर येथे २००९ पासून एप्रिल महिन्यात
नोंदले गेलेले उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअमध्ये)

वर्ष---तापमान(तारिख)
२००९---४६.४(२२)
२०१०---४५.४(२९)
२०११---४१.०(२९)
२०१२---४४.१(२१)
२०१३---४७.६(२९)
२०१४---४४.६(२९,३०)
२०१५---४५.१(२९)
२०१६---४५.६(२२)
२०१७---४६.४(१९)
२०१८---४६.४(३०) 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...