agriculture news in marathi, Chandrapur records highest temperature in country | Agrowon

‘चंद्र’पूर झाले ‘सूर्य’पूर !, देशातील उच्चांकी तापमान !!
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी अजून काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर राहून उन्हाचा चटका कायम राहील. कोकणातही उन्हाची तीव्रता ही कायम राहणार आहे. 

सध्या राजस्थानपासून ते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर लक्षद्वीप आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. येत्या मंगळवार (ता. १५)पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

उन्हाचा पारा वाढत असताना गुरुवारी दुपारनंतर अचानक मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात ढग जमा झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कळसकरवाडी, पाटण येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. सांगली शहरातही वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी काही ठिकाणी गारांचाही पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ अशा अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला यांसह उन्हाळी पिकांचे चांगलेच नुकसान झाले. उर्वरित भागात ढगाळ व कडक ऊन पडून उकाडा वाढला होता. 

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी, जेवळी, अनाळा येथेही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बीड, लातूर, जालना, औंरंगाबाद जिल्ह्यांत उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या होत्या. कोकणातील दक्षिणेकडे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकली येथे सोसाट्याचा वारा सुटून पाऊस पडला. त्यामुळे काजू, आंबा या पिकांचे नुकसान झाले. उर्वरित काही भागात ढगाळ हवामान होते. रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र होते. 

शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३४.०, सांताक्रूझ ३३.६, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.९, पुणे ४०.८, नगर ४३.२, मालेगाव ४४.६, नाशिक ४१.१, सातारा ३९.७, सोलापूर ४२.२, औरंगाबाद ४१.५, परभणी शहर ४२.७, अकोला ४४.८, अमरावती ४३.४, बुलडाणा ४२.०, ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४३.०, नागपूर ४५.०, वर्धा ४५.०, यवतमाळ ४३.२.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...