agriculture news in marathi, chandrashekhar bavankule speaks about crop loan, bhandara, maharashtra | Agrowon

`पीककर्ज न दिल्यास राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील शासकीय खाती गोठवू`
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत खरीप पीककर्ज वाटप न करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बॅंकेकडे वळती करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत खरीप पीककर्ज वाटप न करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बॅंकेकडे वळती करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार परिणय फुके, डॉ. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खरीप पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ३५ हजार ६४४ सभासदांना १६४ कोटी ७६ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी उद्दिष्टांपेक्षा अत्यंत कमी कर्ज वाटप केले आहे. या वेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी बॅंकनिहाय कर्जवाटपाचा आढावा घेतला. १५ जुलैपर्यंत कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याची हमी या वेळी बॅंकांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना दिली.  

जिल्ह्यात एकूण १ लाख ७२ हजार ७०९ शेतकरी नुकसानीमुळे बाधित असून यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून भंडारा जिल्ह्यासाठी ६७ कोटी ९२ लाख रुपये प्राप्त झाले आहे. यापैकी ६७ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २७ कोटी ८२ लाख २८ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व रक्कम आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांनी बैठकीत सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील ६४ हजार ४१५  शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात १८८ कोटी ४३ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावर बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, की प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली याविषयीची माहिती शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात कळवावी. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पीककर्ज वाटप करावे, असे निर्देश त्यांनी दिले. एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी केवळ सातबारा उतारा मागण्यात यावा. या व्यतिरिक्त कुठलेही कागदपत्र मागू नये अशा सूचना त्यांनी दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...