agriculture news in Marathi, Chandrashekhar Bawankule says hailstorm affected farmers will get more benefit, Maharashtra | Agrowon

गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव : चंद्रशेखर बावनकुळे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत प्राथमिक असून त्यासंदर्भाने पुनर्विचार करून भरीव मदत केली जाईल, असे आश्‍वासन नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृती समितीला दिले.

नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत प्राथमिक असून त्यासंदर्भाने पुनर्विचार करून भरीव मदत केली जाईल, असे आश्‍वासन नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृती समितीला दिले.

आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात कृती समितीने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला त्यांनी रविवारी (ता. १८) भेट दिली, यावेळी ते बोलत होते. गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांकरीता आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी (ता. १७) भेट दिली.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सकाळीच काटोल गाठत मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करेपर्यंत आणि आंदोलनस्थळी येऊन मागण्यांची पूर्तता करेपर्यंत ते मागे घेणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्‍त करण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष व प्रयोगशील शेतकरी मनोज जवंजाळ यांनी केळीला ४० हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. त्याच धर्तीवर संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख मिळावे, अशी मागणी यावेळी केली.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट
गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाची समस्या भेडसावू लागली. परिणामी इसापूर (खु) येथील प्रल्हाद मनोहर धोटे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. १७) आत्महत्या केली. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरणे आंदोलनाला दिलेल्या भेटीनंतर इसापूर गाठले. आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सोबत चालण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. त्यानंतर आमदार देशमुख व बावनकुळे यांनी धोटे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...