agriculture news in Marathi, Chandrashekhar Bawankule says subsidy proposal for 199 heacters, Maharashtra | Agrowon

सानुग्रह अनुदानाचा १९९ हेक्टरसाठी प्रस्ताव : बावनकुळे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा सोलर पार्क या प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीपैकी १९९ हेक्टर जमिनीसाठी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.२४) दिले. धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी या प्रकल्पात गेलेल्या जमिनीपोटी योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या कारणावरून सोमवारी (ता. २२) मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 

मुंबई : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा सोलर पार्क या प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीपैकी १९९ हेक्टर जमिनीसाठी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.२४) दिले. धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी या प्रकल्पात गेलेल्या जमिनीपोटी योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या कारणावरून सोमवारी (ता. २२) मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 

सन २००९ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला होता. तेव्हापासून या प्रकल्पाबाबत काहीच निर्णण घेतला गेला नाही. राज्य शासनाने याबाबत निर्णय घेऊन प्रकल्पाला गती दिली. या प्रकल्पासाठी ८२४ हेक्टर जमीन घेण्याचे निश्चित करण्यात आले. मेथी आणि विकरण गावातील शेतकऱ्यांची ६७५ हेक्टर खासगी जमिनीही या प्रकल्पासाठी निश्चित झाली. १४९ हेक्टर शासकीय जमीनही या प्रकल्पासाठी घेण्यात आली.

खासगी आणि शासकीय मिळून या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यापैकी ४७६ हेक्टर खासगी व ४५ हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. सन २०१२ मध्ये ४७६ हेक्टर जमिनीचा मोबदला नियमानुसार ४७.६० कोटी देण्यात आला. उर्वरीत १९९ हेक्टर जमीन गेलेल्या १३८ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला हवा होता. या शेतकऱ्यांनी नियमानुसार महसूल विभागाच्या भूसंपादनाच्या कलम १८ नुसार आपली मागणी न्यायालयाकडे नोंदवायची होती. पण कुणीच कलम १८ नुसार वाढीव मोबदल्याची मागणी केली नाही.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत १९९ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्ताव तयार करावयाच्या सूचना महानिर्मितीला दिल्या. त्यानुसारच येत्या आठ दिवसांत या शेतकऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा सकारात्मक निर्णय शासन घेत आहे.

कोरडवाहू जमिनीसाठी जो मोबदला दिला जाईल. त्यापेक्षा दीडपट मोबदला हंगामी बागाईतदारांसाठी तर दुप्पट मोबदला बागाईतदार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच पहिल्या खरेदीच्या दिनांकापासून आतापर्यंत या रकमेवर व्याजही देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, त्याआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी धर्मा पाटील यांना पंधरा लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या मुलाने, नरेंद्र पाटील यांनी ते घेण्यास नकार दर्शविला होता. वाढीव मोबदल्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....