agriculture news in marathi, Change paisewari system demands farmers in Bhandara district | Agrowon

पैसेवारी पद्धत बदलण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

भंडारा  ः ब्रिटिश काळापासून सुुरू असलेल्या पैसेवारी पद्धतीत बदल करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा दौऱ्यादरम्यान देण्यात आले. 

भंडारा  ः ब्रिटिश काळापासून सुुरू असलेल्या पैसेवारी पद्धतीत बदल करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा दौऱ्यादरम्यान देण्यात आले. 

महाराष्ट्रात आजही ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पद्धतीनुसारच आणेवारी काढली जाते. काळानुरूप अनेक कायद्यांत बदल झाला. आणेवारी पद्धतीदेखील कालसुसंगत असावी, अशी मागणी या वेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले त्याबरोबरच खर्चही दुपटीने वाढला. नैसर्गिक आपत्तीवेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु नुकसान जाहीर करताना पैसेवारीच्या जुनाट पद्धतीचाच वापर होतो. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहतात.

शेतकऱ्यांकडून सक्‍तीने विमा हप्ता वसूल होतो. भरपाईच्यावेळी मात्र अनेक निकष थोपविले जातात. विमा कंपन्या पळवाटा काढत असताना त्यांच्यावर आजवर कोणतीच कारवाई केली गेली नाही. परिणामी शेतकरी मानसिक तणावात येत आत्महत्येसारखा पर्याय निवडतात. परिणामी, कर्ज रकमेतून पीकविम्याची वसुली थांबवावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, रानबा केसलकर, लीलाधर बनसोड, कन्हैया नागपुरे यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...