agriculture news in Marathi, change in planing of seed distribution for Dust sowing, Maharashtra | Agrowon

धूळपेरणी टाळण्यासाठी बियाणे वितरण नियोजनात बदल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे : बोंड अळीचा धोका लक्षात घेता राज्यात धूळपेरणी टाळण्यासाठी बियाणे वितरण नियोजनात कंपन्यांकडून किंचित बदल केला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख कंपन्यांनी आपले बियाणे वितरण नियोजन आराखडे तयार केलेले आहेत. गेल्या हंगामात राज्यभरात २८ कंपन्यांनी एक कोटी ५१ लाख बीटी बियाण्यांची पाकिटे शेतकऱ्यांना दिलेली आहेत. यंदा त्यात १५ लाख पाकिटांची वाढ होणार असल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अडचणी येणार नाहीत, असे कृषी विभागाला वाटते. 

पुणे : बोंड अळीचा धोका लक्षात घेता राज्यात धूळपेरणी टाळण्यासाठी बियाणे वितरण नियोजनात कंपन्यांकडून किंचित बदल केला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख कंपन्यांनी आपले बियाणे वितरण नियोजन आराखडे तयार केलेले आहेत. गेल्या हंगामात राज्यभरात २८ कंपन्यांनी एक कोटी ५१ लाख बीटी बियाण्यांची पाकिटे शेतकऱ्यांना दिलेली आहेत. यंदा त्यात १५ लाख पाकिटांची वाढ होणार असल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अडचणी येणार नाहीत, असे कृषी विभागाला वाटते. 

"कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा तयार करण्यासाठी अत्यावश्यक तयारी केलेली आहे. मात्र, नियोजनात थोडा बदल करून १५ मेच्या आधी बियाण्यांचा पुरवठा न करण्याचा सल्ला कंपन्यांना देण्यात आलेला आहे.

कंपन्यांकडूनदेखील या नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे," अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
धूळपेरणी झाल्यास व त्यातून पुढे पावसाचा ताण बसल्यास बोंड अळीचा धोका वाढतो. त्यामुळेच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीदेखील कपाशीच्या बियाण्यांच्या उपलब्धतेविषयी खास आढावा घेतला आहे. "शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वेळेत आणि पुरेसे देण्यासाठी अत्यावश्यक नियोजन करावे. तसेच, धूळपेरणी टाळण्यासाठी बियाणे उपलब्धतेचादेखील वेळोवेळी आढावा घ्या," अशा सूचना श्री. फुंडकर यांनी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

बीटी बियाण्यांच्या एकूण पुरवठ्यापैकी यंदा राज्यातील टॉप टेन कंपन्यांकडून सव्वा कोटी पाकिटांच्या आसपास पुरवठा होण्याचा अंदाज आहे. अजित सीडसकडून अंदाजे १५ लाख ७२ हजार पाकिटे, तर कावेरी १२ लाख, नुजिविडू २२.८५ लाख, अंकुर २३.९४ लाख, बायर ९.५० लाख, रासी १६ लाख, ग्रीन गोल्ड ९.१२ लाख तसेच महिको कंपनीकडून ९ लाख पाकिटांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे. 

जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने अर्थात जीईसीने मान्यता दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर यंदा ''ब्रॅंड नेम'' टाकले जाणार नाही. को-मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांनी ही बाब मान्य केली असून, कृषी विभागाकडे नव्याने परवाने घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

"गेल्या हंगामात को-मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना सव्वा लाख पाकिटांचा पुरवठा केला होता. यंदा नियमावलीत बदल करण्यात आल्यामुळे या कंपन्यांकडून निश्चित किती पुरवठा केला जाईल याचा अंदाज आलेला नाही. तथापि, राज्यात बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...