agriculture news in marathi, Changes to the schedule of ITI admitions | Agrowon

आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित होते. ही बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्या कालावधीस मुदतवाढ (दोन जुलै) देण्यात आली आहे.

सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित होते. ही बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्या कालावधीस मुदतवाढ (दोन जुलै) देण्यात आली आहे.

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत अर्ज भरणे, दोन जुलैला मूळ कागदपत्रांआधारे अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित आहे. हा अर्ज विद्यार्थ्यांनी नजीकच्या आयटीआयमध्ये जाऊन शुल्क भरून निश्‍चित करणे आवश्‍यक आहे.

 पाच जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर त्याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

...असे आहे वेळापत्रक

  •  ऑनलाइन अर्ज करणे : ३० जूनपर्यंत
  •  प्रवेश अर्ज निश्‍चित करणे : दोन जुलैपर्यंत
  •  पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : तीन जुलैपर्यंत
  •  प्राथमिक गुणवत्ता यादी : पाच जुलै रोजी सकाळी ११ वाजता
  •  गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : पाच ते सहा जुलै
  •  अंतिम गुणवत्ता यादी : १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता
  •  पहिली प्रवेश फेरी : १० जुलै
  •  दुसरी प्रवेश फेरी : ११ ते १६ जुलै
  •  तिसरी प्रवेश फेरी : २१ ते २६ जुलै
  •  चौथी प्रवेश फेरी : ३१ जुलै ते चार ऑगस्ट

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...