agriculture news in marathi, changes in snf may effecting on farmers, pune, maharashtra | Agrowon

‘एसएनएफ’ निकष बदलामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक शक्य
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

काहीही केले तरी शेतकऱ्यांचे ऐकायचेच नाही अशी भूमिका शासनाची आहे. शासनाचा ‘एसएनएफ’ निकष हा दूध धंद्यातील लॉबीच्या सांगण्यानुसार घेण्यात आलेला आहे. ‘एसएनएफ’चा निकष जितका कडक तितकी भेसळ आधिक होणार आहे. यात शेतकऱ्यालाच पुन्हा बदनामीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल.
- गुलाबराव डेरे, अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ.

पुणे  : केंद्र शासनाने लागू केलेल्या गाय दुधाच्या निकषाचा विचार करता ८.३ टक्के ‘एसएनएफ’ आणि ३.२ टक्के फॅटसाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर आता केवळ २२.१० पैसे दर मिळणार आहे. मात्र ‘एसएनएफ’चे निकष ठरविताना पुन्हा शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा परवाना बहाल करण्यात आल्याची टीका दूध उत्पादकांनी केली आहे.

केंद्र शासनाने गाय दुधाचे निकष एक वर्षापूर्वीच बदलले होते. मात्र, शेतकऱ्यांपासून ते दडवून ठेवण्यात आले. केंद्राने ३.२ फॅट व ८.३ ‘एसएनएफ’ला गाय दूध म्हणून मान्यता दिली होती. मात्र, राज्यात दुधाच्या लॉबीने ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएफ’ निकष शेतकऱ्यांच्या माथी मारला,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, की ‘एसएनएफ’च्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांची लुटमार केलेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था लांडग्यांच्या कचाट्यात सापडलेल्या कोकरूसारखी झाली आहे. आंदोलन करा की संघर्ष करा. शेतकऱ्यांची लुट होणार म्हणजे होणार, अशीच भूमिका घेतली जात आहे.

दुधाला प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्याबाबत फॅट आणि ‘एसएनएफ’चे निकष ठरविताना दुग्धविकास विभागाने पद्धतशीरपणे संभ्रम तयार केला होता, असे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. आधी फक्त फॅटचे निकष जाहीर करण्यात आले व ‘एसएनएफ’चा मुद्दा वगळण्यात आला. आता ‘एसएनएफ’चा निकष जाहीर करताना दुधाच्या भेसळीला आमंत्रण देण्यात आले आहे, असे दूध उत्पादकांनी सांगितले.

‘‘राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना अजिबात विचारात घेतले नाही. त्याऐवजी खासगी डेअरीचालक व सहकारी दूध संघांनी सूचविल्याप्रमाणे ‘एसएनएफ’चे निकष ठरविले. ८.५ टक्के ‘एसएनएफ’च्या खाली प्रतिपॉईंट २० पैसे कपात अपेक्षित असताना एक रुपया करण्यात आली आहे. एका पॉईंटसाठी एक रुपया जात असल्यास भेसळ केलेली बरी अशी मानसिकता यातून तयार करण्यात आली आहे, असे दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले.

अभ्यास न करताच काढले जीआर ः नरके
इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरूण नरके यांनी शासनाचे नवे निकष भेसळीला प्रोत्साहन देणारे असल्याचे नमूद केले आहे. फु़ड सेफ्टी अॅक्टमध्ये ३.२ व ८.३ चे निकष निश्चित करताना मोठी चूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे दूध भेसळीला प्रोत्साहन आणि ग्राहकांना कमी प्रतीचे दूध देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, दुधाला आधीचा प्रतिलिटर २७ रुपये व आता प्रतिलिटर २५ रुपये भाव देणारे दोन्ही जीआर अभ्यास न करता काढण्यात आलेले आहेत, असे श्री. नरके म्हणाले.

 

असे असतील गाय दुधाचे नवे खरेदीदर
फॅट  एसएनएफ  दर
३.२ ८.३ २२.१०
३.३  ८.३ २२.४०
३.४ ८.३ २२.७०
३.५  ८.३ २३.००
३.२ ८.४ २३.१०
३.३ ८.४  २३.४०
३.४  ८.४ २३.७०
३.५ ८.४ २४.००
३.२  ८.५ २४.१०
३.३ ८.५  २४.४०
 ३.४ ८.५  २४.७०
३.५ ८.५ २५.००

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...