agriculture news in Marathi, chapter from farmers book in 11th book, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्याच्या पुस्तकातील धडा अकरावीच्या पुस्तकात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

शेतीमध्ये मजुरीची मोठी समस्या आहे. मग मी
शेतीकामाचे वेळापत्रक बदलले. त्यामुळे मला कामाच्या वेळी मजूर मिळतात. जेव्हा लोकांकडे मजुरांची मागणी असते त्या वेळी आपले काम अडत नाही आणि उत्पन्नात म्हणावा तर फारसा फरक पडत नाही आणि जरी फरक पडला तरी तो मजुरांअभावी होणाऱ्या नुकसानीपेक्षा निश्‍चितपणे कमी असतो. 
- वेंकट अय्यर, शेतकरी

मुंबई: आयटी क्षेत्रातील अभियंता ते आदिवासी भागातील शेतकरी असा प्रवास करणाऱ्या वेंकट अय्यर या शेतकऱ्याच्या मूँग ओव्हर मायक्रोचिप्स (moong over microchips) या पुस्तकातील एक धडा राज्य शासनाने महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात समाविष्ठ केला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून या आधुनिक शेतकऱ्याचे शेतीतील इरसाल प्रयोग इंग्रजी माध्यमातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहेत.

साधारण आठ ते नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उच्चभ्रू राहणीमान, मुंबई शहरात फ्लॅट, गाडी आणि सुखवस्तू आयुष्य सोडून या तरुणाच्या डोक्‍यात शेतीचे ‘खूळ'' भरले होते. हे खूळच त्याला शाश्‍वत शेतीच्या प्रवासाकडे घेऊन जाणार होते. आयबीएम कंपनीतील देश-परदेशातील अनुभवाची दहा वर्षांची नोकरी सोडून सर्वोत्कृष्ट संगणक व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या वेंकटने राजीनामा देऊन शेतीची वाट धरली. त्याआधी सेंद्रिय शेती आणि पारंपरिक शेती ते हायटेक शेती जेवढे काही वाचायला मिळाले ते वाचून काढले.

डहाणूजवळ नदीकिनारी पेठगावात चार एकर जमिनीचे स्वप्न पूर्ण झाले. चार एकराच्या शेतामध्ये मधोमध फार्म हाउस आहे. चार एकराचे चार विभाग तयार केले. सेंद्रिय शेतीच्या विचाराने भारलेल्या वेंकटने शेतीही रसायने विरहित केली. अगदी पहिल्या दिवसापासून. फुकुओकाच्या "एका काडातून क्रांती'' पासून भारतीय कृषी संशोधन संस्थेची सेंद्रिय शेतीची प्रकाशने वेंकटच्या संदर्भासाठी सदैव असतात. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करून शेती करण्याचा हट्ट आहे. त्यामुळे चार एकरांत रासायनिक खताची गोणी किंवा कीटकनाशकाचा डबाही दिसणार नाही. 

दुसऱ्या वर्षी वेंकटने शेतात भुईमुगाची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. मजुरांअभावी शेंगा फोडण्याची अडचण निर्माण झाली. टरफलासहित शेंगा पेरुन वेंकटच्या या आधुनिक शोधाने १६ क्विंटलचे विक्रमी उत्पादन मिळाले. गावकऱ्यांना कधीही एकरात सहा ते सात क्विंटलच्या वर भुईमुगाचे उत्पादन मिळाले नव्हते, हे विशेष.

व्यवस्थापन आणि नियोजन जेव्हा शेतात शिरते तेव्हा शेतीचा कायापालट झाल्याखेरीज राहत नाही. व्यवसायाने संगणक अभियंता व्यवस्थापक असल्याने वेंकटने व्यवस्थापनशास्त्राचा कसोट्या आपल्या चार एकराच्या शेतीसाठी वापरल्या. एकच पीक घेण्याऐवजी विविध प्रकारची पिके घेण्याचे नियोजन केले. शेती सुरू केली तेव्हाही मजुरीची समस्या भेडसावत होती. आजही ती भेडसावते, किंबहुना अधिक वाढली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वेंकटने शेतीचे वेळापत्रकच बदललेले आहे. 

वेंकटच्या शेतामध्ये भाताच्या लागवडीची तयारी मे महिन्यात सुरू होते. याबाबत वेंकट अय्यर सांगतात, "शेवटी उत्पादन घ्यायचे. समस्या मजुरीची आहे. मग माझेच वेळापत्रक बदलले. त्यामुळे पाहिजे त्या वेळी मजूर मिळतात. जेव्हा लोकांकडे मजुरांची मागणी असते त्या वेळी आपले काम अडत नाही आणि उत्पन्नात म्हणावा तर फारसा फरक पडत नाही आणि जरी फरक पडला तरी तो मजुरांअभावी होणाऱ्या नुकसानीपेक्षा निश्‍चितपणे कमी असतो. ‘ॲग्रोवन''चा वाचक असल्याने शेतीविषयक घटनांची तंतोतंत माहिती मिळते, असेही ते प्रांजळपणे कबूल करतात. 

आयबीएम कंपनीत शिकलेल्या व्यवस्थापन शास्त्राची कसोटी आता शेतीमध्ये लागते. शेताच्या चारही विभागाच्या इत्थंभूत नोंदीचे रजिस्टर ठेवली आहेत. त्यामध्ये खर्च आणि उत्पन्नाचा रोजचा ताळेबंद ठेवला जातो. वेंकट अय्यर यांनी त्यांच्या शेतीतील हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. गेल्यावर्षी त्यांचे मूँग ओव्हर मायक्रोचिप्स हे पुस्तक प्रकाशित झाले. तर यंदा त्याची दखल घेत राज्य शासनाने या पुस्तकातील एक धडा इंग्रजी माध्यमाच्या अकरावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ केला आहे. या रुपाने जणू नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय योग्यच होता याची पोचपावतीच वेंकट अय्यर यांना मिळाली आहे.

काय आहे या प्रकरणात
आदिवासी भागात पूर्वीच्याकाळात कसबई नावाच्या सुगंधी भाताची लागवड केली जात होती. काही वर्षांपर्यंत आदिवासी पट्ट्यात स्थानिक भाताच्या या वाणाची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती. हे भातच आदिवासी कुटुंबे खात होती. मात्र, काळाच्याओघात इतर वाणांप्रमाणे भाताचं हे वाणसुद्धा कमी झाले आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले हे भाताचं वाण अय्यर यांनी पुन्हा शोधून काढले आहे. डोंगरकपाऱ्यातील काही मोजके आदिवासी अजूनही या भाताची लागवड करतात आणि तेच खातात हे कळल्यानंतर अय्यर यांनी अनेक प्रयत्नातून या वाणाचं संवर्धन सुरू केले आहे, त्याची कहाणी पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणात करण्यात आली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...