पैदाशीसाठी जातिवंत, सुदृढ नराची निवड करावी.
पैदाशीसाठी जातिवंत, सुदृढ नराची निवड करावी.

शेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्व

पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. यशस्वी शेळीपालनासाठी जातिवंत शेळ्या अाणि नराची निवड याला अधिक महत्त्व अाहे. शेळीपालनाचे आर्थिक गणित शेळ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अापल्या भागातील वातावरण अाणि भाैगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जातींची निवड करावी. शेळीची व नराची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. शेळीची निवड उत्तम दुग्धोत्पादन असणाऱ्या माद्या कळपात निर्माण झाल्याने जास्त वजनाची करडे विक्रीसाठी उपलब्ध होतात.

  • पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानेच शेळ्यांची खरेदी करावी.
  • साधारणपणे एक वेत झालेल्या शेळीची निवड करावी. यावरूनच सर्व इतर गुणधर्माविषयी माहिती मिळेल. उदा. करडांची संख्या, दूध उत्पादन, आजार, वर्तणूक इ.
  • शेळीची वंशावळ पाहून खरेदी केल्यास उत्तम. तिची आई जुळी करडे देणारी असावी.
  • शेळीचे वय, करडांची संख्या तसेच दूध देण्याचे प्रमाण या बाबी तपासाव्यात.
  • शेळी चपळ, आकाराने मोठी, केस मऊ व चमकदार असावेत.
  • दुभती शेळी असेल तर तिची कास पाहून, दूध काढून पाहणे महत्त्वाचे आहे.
  • तोंडापासून ते शेपटीपर्यंत शेळी लांब, सरळ असावी.
  • पैदाशीचा नर निवडताना जातिवंत नरामुळे उत्तम अनुवंश कळपात तयार होतो. कळपातील गर्भधारणेचे व जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पुढील पिढ्यांची उत्पादन क्षमता, प्रजोत्पादन क्षमता चांगली ठेवली जाते.

  • पैदाशीचा नर चपळ अाणि दोन जुळ्या नरांपैकी असावा. त्यामुळे पुढील पिढी चांगली करडांची संख्या देणारी निपजेल.
  • कळपामध्ये सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा नर असावा.
  • कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
  • दिसायला उंच, लांब असावा. मानेवर सिंहासारखे आयाळ असावे.
  • नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
  • संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७ (विषय विषेशज्ञ, पशू संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com