agriculture news in Marathi, charge fear at agri department , Maharashtra | Agrowon

कृषी कार्यालयात ‘चार्ज’ची भीती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

अकोला ः मोठ्या पदाचा चार्ज मिळावा म्हणून जिवाचे रान करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी पाहायला मिळतात. थेट मंत्र्यांपासून फिल्डिंग लावली जाते. परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी कार्यालय सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घ्यायची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.

अकोला ः मोठ्या पदाचा चार्ज मिळावा म्हणून जिवाचे रान करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी पाहायला मिळतात. थेट मंत्र्यांपासून फिल्डिंग लावली जाते. परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी कार्यालय सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घ्यायची भीती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे.

या ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यापासून रिक्त झालेल्या पदांवर जायला कुणीही तयार नाही. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पदभार घेण्यासाठी एका मागोमाग पत्रे काढावी लागत आहेत. अशा कारभारामुळे कृषी विभागातील (कथित) नियम व शिस्तीची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत. 

काही दिवसांपूर्वी या ठिकाणचा तालुका कृषी अधिकारी जलयुक्तचे देयक काढण्यासाठी लाच घेताना अडकला. आधीच मार्च महिना हा शासकीय विभागांसाठी आर्थिक खर्चाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र याच काळात लाचखोरी झाली व अकोट तालुका कृषी कार्यालयाच्या मागे शुक्‍लकाष्ट सुरू झाले. तालुका कृषी अधिकारी व एक कर्मचारी अडकल्यापासून या ठिकाणी असलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये एका अनामिक भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकऱ्यांच्या दृृष्टीने अकोट हा जिल्ह्यातील एक चांगला तालुका आहे. येथील केळी विदेशात निर्यात होत आहे. या तालुक्‍यातील शेती सुपीक असून, सिंचनही बऱ्यापैकी आहे. शेतकरी फळबागांकडे वळाले आहेत. परंतु येथील कृषी विभागाची घडी मोठ्या प्रमाणात विस्कटली आहे. आता तालुका कृषी कार्यालयात केवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी दिसून येतात. आधीच मंडळ अधिकारी, पर्यवेक्षकांची पदे रिक्त होती. तर आता या ठिकाणी कार्यरत असलेल्यांपैकी अनेक जण आजारी सुटीवर गेले आहेत.

सुरवातीला पर्यवेक्षकांना पदभार स्वीकारण्याच्या आर्डर निघाल्या. एक एक करीत हा अतिरिक्त पदभार न घेणारे वाढल्याने आता हे रिक्त पद सांभाळण्यासाठी चक्क कृषी सहायकाच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना ऑर्डर काढण्याची वेळ आली आहे. यापूर्वी ज्या पर्यवेक्षकाकडे पदभार दिला होता त्यांनी आजारी रजा घेतल्याने हा पदभार कृषी सहायकाने स्वीकारावा, असे आदेश १० एप्रिलला काढलेल्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. हे पत्र राज्यातील कृषी विभागाच्या विविध ग्रुपवर सध्या धुमाकूळ घालत असून, खात्याची लक्तरे मांडत फिरते आहे. 

कृषीच्या ‘आरोग्या’चीच तपासणी हवी
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अकोट तालुका कृषी खात्यात सुरू असलेला सावळागोंधळ थांबता थांबेना अशा स्थितीत पोचला आहे. अनेक जण आजारी रजेवर गेले आहेत. जे कार्यरत आहेत त्यांना हा चार्ज नको आहे. एकूणच कृषी विभागाच्या बिघडलेल्या ‘आरोग्या’ची तज्ज्ञांकडून तपासणीची गरज व्यक्त होत आहे. 

कारवाई करणार
कर्मचाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार न स्वीकारणे, आजारी रजेवर जाणे याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील त्रासामुळे कुणी पदभार घ्यायला तयार नसल्याचे सांगितले. कुणी अतिरिक्त चार्ज घेत नसल्याने कृषी सहायकाच्या नावे ऑर्डर काढली. टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

कामकाज ठप्प
कृषी विभागातील अशा अनागोंदीमुळे अकोट तालुक्‍यातील कृषी विभागाचे कामकाज ठप्प झालेले आहे. मार्चअखेर विविध योजनांचा निधी खर्च झालेला नाही. योजनांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अकोला जिल्ह्यात सध्या चार तालुक्‍यांना पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नाहीत. काही ठिकाणी मंडळ अधिकारी वर्षानुवर्षे पदभार सांभाळत आहेत. नवीन अधिकारी न देण्याचे कारण गुलदस्तात आहे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...