agriculture news in marathi, Charitra severe in Risod taluka | Agrowon

रिसोड तालुक्यात चाराटंचाई गंभीर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

दुधाचा सरासरी फॅट पाच ते सहा दरम्यान लागतो. मागील एक महिन्यापासून दूध कमी झाल्याने अर्धा फॅट दूध उत्पादकांसाठी वाढविला आहे. सरासरी तीस ते पस्तीस रुपयांचा दर प्रतिलिटरप्रमाणे दिला जात आहे. 

- शंकर कोकाटे, ज्ञानराज दूध संकलन केंद्र

रिसोड जि. वाशीम : तालुक्यातील अल्प पावसाचा फटका शेती उत्पन्नासह चाराटंचाईला सुद्धा बसला आहे. ज्वारी, मका, कपाशीसारख्या पिकांमधून काही प्रमाणात चाराटंचाईवर मात केली जात होती. जनावरांचे संगोपन करण्याची गंभीर समस्या सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. 

तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. या जनावरांचे मुख्य खाद्य कडबा, गवत, मका, तूर, सोयाबीनचे कुटार हेच आहे. परंतु या चाऱ्यांचेही दर वाढले आहेत. कडबा एक हजार रुपयाला शंभर पेंढी, गवत तीन हजार रुपयाला शंभर पेंढी, तुरीचे कुटार दोन हजार रुपये गाडी, तर सोयाबीन कुटार पाचशे रुपये गाडी, असे दर आहेत. त्यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत.

या टंचाईवर मात करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी लोक प्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पशुपालकांनी केली.

टंचाईमुळे तालुक्यात दूध उत्पादनावरही येत्या काळात परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील एक महिन्यापासून दूध संकलन केंद्रावर दुधाची आवक कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. 

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...