agriculture news in marathi, Chatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated worldwide | Agrowon

पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात अाली. शिवनेरी या शिवरायांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांनी शिवजन्म सोहळ्यास सहभाग नोंदविला. नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनासह विविध भागांत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी-जय शिवाजी’ अादी जयघोषांनी शहरांसह गावे दुमदुमून गेली होती. शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे राज्यात अायोजन करण्यात आले.

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात अाली. शिवनेरी या शिवरायांच्या जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांनी शिवजन्म सोहळ्यास सहभाग नोंदविला. नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनासह विविध भागांत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी-जय शिवाजी’ अादी जयघोषांनी शहरांसह गावे दुमदुमून गेली होती. शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे राज्यात अायोजन करण्यात आले. पुण्यात शिवकालीन मनसबदार घराण्यांसह विविध संघ-संघटनांनी शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, शौर्य उपक्रम, मिरवणुकांचे आयोजन केले होते.

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलिसप्रमुख सुवेझ हक उपस्थित होते. या वेळी शिवजन्माचा पाळण्याचा पारंपरिक साेहळा साजरा झाला. फडणवीस यांनी शिवछत्रपतींची पालखी घेऊन त्यातील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच शिवजयंती सोहळा पार पडला. यास छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अादी उपस्थित होते. यानंतर मिरवणूकही काढण्यात आली. सोशल मीडियावर शिवजयंती सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचा देशासह जगभरातील भारतीयांना लाभ घेता आला. दिवसभर शिवरायांना अभिवादन करणारे संदेश आणि विषयांनी हे माध्यम गजबजून गेले होते.

‘‘शिवरायांचे गड किल्ले हे जागत इतिहास असून प्रेरणास्राेत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक विभागाकडून २८ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी १२८ काेटींचा निधी मंजूर केला आहे.’’
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...