जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये

जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल ३००० रुपये

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २५) चवळीच्या शेंगांची सात क्विंटल आवक झाली. चवळीला ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक कमी असून, दर टिकून आहेत. आवक जळगाव, पाचोरा, धरणगाव भागातून होत असल्याचे सांगण्यात आले.

बाजारात लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाला. पपईची सात क्विंटल आवक झाली. पपईला प्रतिक्विंटल १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर होता. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला प्रतिक्विंटल १२०० ते १२२५ व सरासरी १३०० रुपये दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० व सरासरी १५०० रुपये दर होता. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. तिला ५०० ते १५०० व सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. गवारची दोन क्विंटल आवक झाली. गवारला प्रतिक्विंटल ४००० रुपये दर मिळाला. काकडीची १० क्विंटल आवक झाली.

काकडीला ५०० ते १००० व सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लाल कांद्याची ६०० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २५० ते ८०० व सरासरी ६०० रुपये दर होता. कारल्यांची १२ क्विंटल आवक झाली. कारल्यास प्रतिक्विंटल १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. पत्ताकोबीची १८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १२ क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये दर होता. मेथीची सात क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपये दर होता.

पालकची दोन क्विंटल आवक झाली. पालकला प्रतिक्विंटल २२०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २२ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल ३०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाला. वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल ६०० ते १५०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल ७०० ते १००० व सरासरी ८०० रुपये दर होता. पोकळ्याची सात क्विंटल आवक झाली. पोकळ्याला प्रतिक्विंटल १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये दर होता. गिलक्‍यांची पाच क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल ८०० ते १२०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com