समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय काँग्रेस धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र आणून आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

नाशिक (प्रतिनिधी) : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय काँग्रेस धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र आणून आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

दोनदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या कारभारावर तोफ डागताना ते म्हणाले, की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन देऊन सरकार सत्तेत आले. पण, पावसाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. सिडकोसाठी २४ एकरचा भूखंड बिल्डरला साडेतीन कोटी रुपयांमध्ये विकला गेला. यातील अनियमितता बाहेर काढल्यावर मुख्यमंत्र्यांना करार रद्द करावा लागला.

अधिकारी, बिल्डर या सोनेरी टोळीची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णयही घ्यावा लागला. कर्जमाफीचा घोटाळाही बाहेर काढण्यात आला. केंद्र सरकारवरील अविश्‍वास ठरावाच्या निमित्ताने राफेल विमान खरेदीचा प्रस्ताव चर्चेत आणला. या खरेदीत ३५ ते ३६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता आहे.

शेतमालाला हमीभाव, रोजगाराचे प्रश्‍न महत्त्वाचे असताना बुलेट ट्रेनसारखे अनाकलनीय निर्णय सरकार घेत आहे. सनातन संस्थेवर बॅन लावा म्हणून आपण मुख्यमंत्री असताना केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या वेळी दाभोलकरांची हत्या झालेली नव्हती. सनातनच्या पोटात अनेक संघटना दडल्या असून, सरकारने या संघटनांना राजाश्रय नेमका कोणाचा हे शोधून काढले पाहिजे. भीमा-कोरेगावची दंगल उसळल्यानंतर संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी आम्ही त्या वेळी केली होती.

शिवप्रतिष्ठान संघटनाही युवकांना भडकविण्याचे काम करीत असून, आता तरी त्यांना अटक करणार का. मराठा आरक्षणासाठी राज्यभर जे काही मोर्चे निघाले ती परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले, असेही श्री. चव्हाण म्हणाले.ले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com