agriculture news in marathi, Chavi Rajavat, interview, Rajasthan | Agrowon

...या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार घेतला !
विनया पाटील
रविवार, 24 सप्टेंबर 2017

या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार घेतला. सरपंचपदाच्या पहिल्या कार्यकाळात गावात पाणी, वीज, रस्ते, गटारी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशा मूलभूत सुविधांवर काम केले. त्यानंतर दुसऱ्यांदाही गावकऱ्यांनीच मला सरपंचपदी कायम राहण्याचा आग्रह केला. या दुसऱ्या टप्प्यात मी शिक्षण, कौशल्य विकास, शेतीचा विकास, पर्यावरण संतुलनावर भर दिला.

-  छवी राजावत, सरपंच, सोडा, राजस्थान

राजस्थानमधील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांनी प्रयत्नपूर्वक गावाचा कायापालट केला आहे. ग्रामीण विकास आणि ग्रामीण भागात उच्चशिक्षित महिला सरपंच म्हणून काम करताना त्यांना अनेक अनुभव आले. ‘सकाळ टाइम्स’च्या प्रतिनिधी विनया पाटील यांनी राजावत यांची घेतलेली ही मुलाखत...

तुमच्या आजवरच्या प्रवासाबद्दल तसेच
सरपंचपद स्वीकारण्याबद्दल काय सांगाल?

ः खरे तर, सोडाचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने मी गावकऱ्यांच्या आग्रहास्तव सरपंच होण्यास तयार झाले. सोडामध्ये २००९-१०च्या भीषण दुष्काळात कृषीआधारित असलेले गाव पूर्ण उद्‌ध्वस्त झाले. त्यामुळे या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार घेतला. सरपंचपदाच्या पहिल्या कार्यकाळात गावात पाणी, वीज, रस्ते, गटारी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशा मूलभूत सुविधांवर काम केले. त्यानंतर दुसऱ्यांदाही गावकऱ्यांनीच मला सरपंचपदी कायम राहण्याचा आग्रह केला. या दुसऱ्या टप्प्यात मी शिक्षण, कौशल्य विकास, शेतीचा विकास, पर्यावरण संतुलनावर भर दिला.

पर्यावरण संतुलनाची तयारी कशी केली?
ः गावामध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असल्याने जलस्रोत आणि जंगलांचे रक्षण आणि पुनरुज्जीवन केले. आता आम्ही तज्ज्ञांच्या साहाय्याने पुढच्या पिढीला मानव आणि निसर्गामधील सहचर्याचे नाते समजून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

तुमच्यासमोरील प्रमुख आव्हाने कोणती?
ः निधीचा आणि कौशल्याची कमतरता ही प्रमुख आव्हाने आहेत. दर्जेदार शिक्षण, कृषी आदी विषय माझ्या अभ्यासाचे नसल्याने तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही या आव्हानावर मात करण्याची आशा बाळगून आहोत. 

यासंदर्भात तुमच्या भोवतालच्या व्यवस्थेचे सहकार्य कसे आहे?
ः भारतातील पंचायत व्यवस्थेचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झालेले नाही. कोणत्याही गावच्या सरपंचाचा बाहेरील जगाशी फारसा संपर्क नसतो. ते पंचायत सचिवांवर अवलंबून असतात. त्यामुळे व्यवस्था प्रत्यक्षात व्यक्तिगत पातळीवर काम करते. सत्तेत असणाऱ्या सर्व व्यक्तिगत घटकांकडे विकासाची समान दृष्टी असल्यासच विकास घडून येतो. 

महिला म्हणून सामना कराव्या लागलेल्या आव्हानांबद्दल...
ः मी सांगितल्याप्रमाणे पंचायत व्यवस्था सक्षम नसणे, हे पहिले आव्हान आहे. माझ्या महिला असण्याचा मुद्दा नंतरचा आहे. अपेक्षित साहाय्य न मिळाल्याने गोंधळलेले अनेक पुरुष सरपंच मी पाहिले आहेत. अर्थात, तरुण महिला असल्याने फरक पडतोच. बहुतांश सरकारी अधिकारी पुरुष असल्याने एखाद्या महिलेने विचारलेल्या प्रश्‍नांमुळे ‘पुरुषी अहंकार’ दुखावला जातोच. त्यातही महिलेला धमकाविण्याचे मार्ग असतात. तरीही मी कामाचा भाग म्हणूनच या सर्वांकडे पाहते. 

तुमच्या मते अशा परिस्थितीवर उपाय काय?
ः तुम्हाला सर्वत्र काही चांगले लोकही भेटतात. अर्थात, त्यासाठी तुम्हाला अनेक दरवाजे ठोठावून निराशाही पदरी पाडून घ्यावी लागते. तुमच्याकडे प्रचंड संयम आणि चिकाटी हवी. मला माझ्या पालकांकडूनही ध्येयावरचे लक्ष्य विचलित न होण्यासाठी पाठिंबा मिळाला.  शेवटी आपल्यामुळे फरक पडत असल्याचे लक्षात आल्यावर पुढील प्रवास सुकर होतो. 

पुरुषसत्ताक पद्धतीचा सामना कसा केला?
ः शहरी भागात राहणे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम बनविणारे असते. महिलेच्या हाती अधिकार दिल्याने फरक पडतो. मी बालविवाहाविरुद्धही उघडपणे आवाज उठविला आहे. माझ्यासारखी महिला सरपंच पाहून लोकांना त्यांच्या मुलींना शिकविण्याची प्रेरणा मिळाली आहे. तरीही शिकू न देणाऱ्या पालकांविरुद्ध मुलीच माझ्याकडे तक्रार करतात. सहजसोप्या संवादामुळे ही समस्या सुटू शकते. गावातील अनेक लोकांनी आपल्या मुलीचे नाव ‘छवी’ ठेवले असून, प्रौढ महिलाही शिक्षणासाठी पुढे सरसावत आहेत. हे सकारात्मक चिन्ह असून लोक नव्या कल्पनांचे नेहमीच स्वागत करतात, मुद्दा फक्त पहिले पाऊल उचलण्याचा असतो.
 
एखाद्या राजकीय पक्षाने तुमच्याशी संपर्क केला आहे का? तो केला असल्यास तुमची भूमिका काय आणि राजकीय पाठबळाशिवाय टिकाव धरणे कितपत अवघड आहे?
 अजून तरी कुठल्या पक्षाने संपर्क केला नाही. मात्र, तळागाळात काम करणाऱ्या पक्षाची निवड करण्याचा निकष मी ठेवला आहे. त्याचप्रमाणे, पंचायत स्तरावर पक्षीय राजकारण अभिप्रेत नाही. त्यामुळेच येथील राजकारणाला मुख्य प्रवाहातील राजकारण असे संबोधले जात नाही.

तुमच्या मते ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली कोणती?
आपल्या देशातील विविधता पाहता सर्व मुद्यांवर अशी कुठलीही एकच गुरुकिल्ली नाही. मात्र, मूलभूत सुविधांच्या पूर्ततेला पर्याय नाही, हे माझे मत आहे. पाणी, घरे, वीज पुरविलीच पाहिजे. शिक्षणाबरोबरच कौशल्ये आणि नागरिकत्वाची जोपासणूक करण्याचे धडेही द्यायला हवेत. सशक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे महत्त्वाचे आहे. देशाच्या विकासात जातीयवादाचा सर्वांत मोठा अडथळा आहे 

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...