agriculture news in marathi, cheak pea in market due to no Auction | Agrowon

लिलावाअभावी हरभरा बाजारात पडून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल चोपडा व अमळनेर बाजार समितीत न्यावा लागत आहे. तसेच अनेक शेतकरी गावातच स्थानिक व्यापाऱ्यांना कमी अधिक दरात विक्री करीत आहेत. हरभरा पडून असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शासकीय खरेदीबाबत व्यवस्थित सुरू नसल्याने हरभरा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल चोपडा व अमळनेर बाजार समितीत न्यावा लागत आहे. तसेच अनेक शेतकरी गावातच स्थानिक व्यापाऱ्यांना कमी अधिक दरात विक्री करीत आहेत. हरभरा पडून असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शासकीय खरेदीबाबत व्यवस्थित सुरू नसल्याने हरभरा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

हरभऱ्याचे उत्पादन यंदा अधिक आले आहे. कारण जळगाव जिल्ह्यात सुमारे ८५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. जशी हरभऱ्याची स्थिती आहे. शासकीय खरेदी केंद्रात हरभरा खरेदी दुपारी बंद केली जाते. कर्मचारी गायब होतात. रोज हरभरा खरेदीचा लक्ष्यांक कर्मचारी ठरवितात नंतर केंद्र बंद करतात. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागते. जशी हरभऱ्याची स्थिती आहे, तशीच स्थिती मका व गव्हाची आहे. 

मक्‍याचे उत्पादन यंदा कमी आहे. परंतु रावेर व जळगावमधील खरेदीदारांनी कृत्रिम मंदी तयार केली आहे. मक्‍याची आवक कमी आहे. गव्हाची आवकही फारशी नाही. जळगाव बाजार समितीत गव्हाची प्रतिदिन सुमारे १५० क्विंटलपर्यंतच आवक असते. अशीच स्थिती यावल व रावेर बाजारातही आहे. जळगाव बाजार समितीत आवक झाली तरी लिलाव होत नाही. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल नाईलाजाने घरी न नेता अडतदारांकडे ठेवावा लागतो. अडतदार काय दर हवा, असे विचारतात. त्यात मक्‍याला प्रतिक्विंटल १२०० रुपये दर हवा असला तर ३५ दिवस लागतील, असे उत्तर दिले जाते.

गव्हाच्या बाबतीतही कृत्रिम मंदी निर्माण केल्याने त्याचेही लिलाव जळगाव बाजार समितीत होत नाहीत. अनेक व्यापारी गहू व मक्‍याची कापसाप्रमाणे खेडा खरेदी करीत आहेत. पण दर अपेक्षित देत नाहीत. खेडा खरेदीत मक्‍याला कमाल १११५ रुपये प्रतिक्विंटलचा दर देत आहेत. १०० ते ३०० क्विंटल मका असला तर ११७० रुपयांपुढे दर संबंधित शेतकऱ्याला देत आहेत. परंतु पैसे १० ते १५ दिवस उधारीने देण्याच्या अटीवरच खेडा खरेदी काही जळगाव व लगतच्या भागातील व्यापारी किंवा खरेदीदार गावोगावी करीत आहेत. 

गहू, मक्याची अावक  
तर चार ते पाच मका उत्पादक मिळून एका मोठ्या मालवाहूने शेतीमाल चोपडा किंवा अमळनेर बाजार समितीत नेत आहेत. चोपडा व अमळनेरात रोज लिलाव होतात. सेम डे चेक प्रमुख अडतदार देतात. त्यामुळे चोपडा व अमळनेर बाजार समितीत मक्‍याची आवक बऱ्यापैकी असून, या दोन्ही बाजार समित्यांमध्ये मक्‍याची रोज मिळून सुमारे २००० क्विंटल तर गव्हाचीही सुमारे १७०० ते १८०० क्विंटल आवक होत असल्याचे सांगण्यात आले. 

जळगाव बाजार समितीत काही अडतदार शेतकऱ्यांची अडवणूक करतात. त्यांनीच लिलाव प्रक्रिया बंद पाडली. लिलाव सुरू झाले की लिलावात सहभाग घेत नाहीत. शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम द्यायची आणि नंतर त्यांचा शेतीमाल दोन-दोन महिने विकायचा नाही, असे प्रकार काही जण करतात. 
- किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा (जि. जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...