agriculture news in marathi, Check the bull's ability to run | Agrowon

बैलांची धावण्याची क्षमता तपासणार
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, बैलाची शरीररचना विचारात घेता, बैल हा प्राणी घोड्याप्रमाणे शर्यतीमध्ये धावण्यास सक्षम नाही, असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी बैलांच्या धावण्याची क्षमता तपासण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, बैलाची शरीररचना विचारात घेता, बैल हा प्राणी घोड्याप्रमाणे शर्यतीमध्ये धावण्यास सक्षम नाही, असे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी बैलांच्या धावण्याची क्षमता तपासण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

राज्यातील ग्रामीण भागांमध्ये बैलगाडा शर्यत हा स्थानिक उत्सव, जत्रा आणि धार्मिक यात्रांमध्ये उपक्रम असतो. बैलगाडा असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. यात्रा उत्सवांमध्येही बैलगाडा शर्यतींना परंपरा, रूढी आणि धार्मिक सोहळ्याचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यतींच्या आयोजनामध्ये परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आल्या.

मात्र या सुधारणांविरोधात ‘भारतीय जीवजंतू कल्याण मंडळा’ने २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय देताना, ‘बैल हा घोड्यासारखा कार्यकौशल्य प्रदर्शित करणारा प्राणी नाही. बैलाची शरीररचना विचारात घेता, तो शर्यतीमध्ये धावण्यास सक्षम नाही,’ असे निरीक्षण नोंदविले होते.

त्याच्या आधारे उच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने २ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नऊ तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

या समितीने राज्य, देश व तसेच परदेशातील पशुवैद्यकशास्त्र तज्ज्ञांची मदत घेऊन एक महिन्यात हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...