agriculture news in marathi, Chickpea purchase starts from today | Agrowon

राज्यात आजपासून हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किंमत समर्थन योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामातील हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी सर्वाधिक १२ क्विंटल, तर बीड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी १ क्विंटल ७५ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार सोमवार (आज)पासून हरभरा खरेदी सुरू करावी, असे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागांतर्फे देण्यात आले आहेत. 

परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किंमत समर्थन योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामातील हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी सर्वाधिक १२ क्विंटल, तर बीड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी १ क्विंटल ७५ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार सोमवार (आज)पासून हरभरा खरेदी सुरू करावी, असे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागांतर्फे देण्यात आले आहेत. 

किंमत समर्थन योजनेअंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी पोर्टलची लिंक मिळत नसल्यामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्याप नोंदणी सुरू न झालेल्या केंद्रांवर हरभरा खरेदी उशिराने सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाजारपेठेत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून, प्रतिक्विंटलचे दर चार हजार रुपयांपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रावर तत्काळ हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

२०१८-१९ मध्ये हमीभावाने हरभरा खरेदीसाठी निश्चित केलेली जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)  :
परभणी ५.८०, हिंगोली १०.६०, नांदेड ८, लातूर ६.५०, उस्मानाबाद ४.५०, बीड १.७५, जालना ३.५०, औरंगबाद ४.५०, बुलडाणा ८, अकोला ११.५०, वाशीम ६.५०, अमरावती १२, यवतमाळ ८.१०, वर्धा १०.३०, नागपूर १०.५०, भंडार ६, गोंदिया ८.२०, चंद्रपूर ७.५०, गडचिरोली ४, नाशिक ७.५०, धुळे ६.५०, नंदूरबार ६.८५, जळगाव ९.६०, नगर २.२०, पुणे ३.४०, सोलापूर ६, सातारा ६, सांगली ६.८५, कोल्हापूर ९.५०, रत्नागिरी ६.९०, रायगड ३.९०, पालघर ६.६२, ठाणे ६.३७. 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...