agriculture news in marathi, Chief Minister assured to give water to 'Nimna Dudhana` | Agrowon

‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी राखून ठेवून शिल्लक राहिल्यास सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. ते प्राधान्याने चारा पिकासाठी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१३) परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी राखून ठेवून शिल्लक राहिल्यास सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. ते प्राधान्याने चारा पिकासाठी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१३) परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी दोन्ही कालव्याद्वारे पाणी आवर्तने सोडण्याची मागणी केली होती. सेलू येथे या मागणीसाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची मागणी तसेच जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सेलू, मानवत, जिंतूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत दुधना प्रकल्पातून दोन पाळ्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा विभागाचे सचिव यांना रावते यांनी दिले, तसेच त्या संदर्भातील आदेश काढण्याच्या सूचना केल्या.

 परभणीच्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी निम्न दुधना प्रकल्पातून प्रत्येकी ५ लाख घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश निघण्याची शक्यता आहे. कालव्याद्वारे पाणी सोडल्यास जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना फायदा होईल. तसेच पाण्यामुळे जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चाराही उपलब्ध होईल, असे रावते यांनी सांगितले. दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...