agriculture news in marathi, chief minister dont give any assurance to farmers, solapur, maharashtra | Agrowon

सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍वासनांचा ‘दुष्काळ’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात सरसकट हे वास्तव असताना, त्यात दुष्काळाच्या पहिल्या यादीत केवळ नऊ तालुक्‍यांचा समावेश करत दोन तालुके वगळले आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आढाव्यासाठी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता.१७) सोलापुरात आले.

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात सरसकट हे वास्तव असताना, त्यात दुष्काळाच्या पहिल्या यादीत केवळ नऊ तालुक्‍यांचा समावेश करत दोन तालुके वगळले आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आढाव्यासाठी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता.१७) सोलापुरात आले. पण ग्रामीण भागातील दुष्काळाच्या या गंभीर संकटाबाबत फारसे न बोलता, शहरातील विविध प्रश्‍नांसह अन्य विभागांचा आढावा घेत, संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करणे वा मदत, या सगळ्याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन न देता त्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली.
 

मुख्यमंत्री फडणवीस सकाळी दहा वाजता अगदी वेळेत सोलापुरात पोचले, ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या बैठकांच्या नियोजनानुसार तीन बैठका ते घेणार होते. पहिल्या टप्प्यात त्यांनी विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला, त्यानंतर महापालिकेशी संबंधित कामांचा आढावा घेतला, त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पण दुष्काळाच्या आढाव्याबाबत त्यांच्या नियोजनात कुठेच उल्लेख नव्हता. या कार्यक्रमानुसारच सगळ्या बैठका पार पडल्या.
त्यामुळे दुष्काळ इथेही मागे पडल्याचे चित्र होते.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामाच्या सुरवातीपासून आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हातचा गेला आहे, पण रब्बीबाबतही आता साशंकता आहे. एवढी भीषण परिस्थिती उदभवली असताना, मुख्यमंत्री फडणवीस काहीसा दिलासा देतील, अशी भाबडी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती.

त्यातच गेल्या दोन आठवड्यात दोनदा ठरलेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता, बुधवारीही ते येणार की नाही, याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अखेरीस ते आले, पण हात रिकामे ठेवूनच गेले.

बैठकांपासून लोकप्रतिनिधीही दूर
मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण जिल्ह्यातील कोणत्याही आमदार, जिल्हा परिषद सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींना बैठकीचे आमंत्रण नव्हते. त्यामुळे समोर फक्त अधिकारी, विषय मांडणार कोण? हा प्रश्‍न होता. काही लोकप्रतिनिधी बैठकीसाठी म्हणून आले. पण त्यांना आमंत्रण नसल्याने बाहेरच थांबावे लागले. ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
 
दुष्काळापेक्षा शहरी प्रश्‍नांवर जोर
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात ऑक्‍टोबरअखेर दुष्काळी परिस्थितीची आणखी पाहणी होईल. दुष्काळाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे, असे सांगत ट्रीगर दोननुसार काही तालुके त्यात समाविष्ट झाले आहेत. उर्वरित तालुक्‍याबाबत ग्राउंड रिपोर्टनुसार कार्यवाही करू, असे तांत्रिक कारण दिले. टॅंकरची सध्या गरज वाटत नाही, पण चाऱ्यासाठी वैरणविकास योजनेतून १५०० हेक्‍टरवर मका लागवडीसाठी प्रयत्न केले जातील. पाण्यासाठी विहिरी, विंधन विहिरी अधिगृहित करण्यात येतील, असे ठोकळेबाज उत्तर देत दुष्काळाच्या परिस्थितीबाबत ठोस न बोलता, आश्‍वासन न देता हा विषय आटोपता घेतला. पण शहराच्या विविध प्रश्‍नांवर मात्र अगदी दिलखुलास उत्तरे दिली. याच पत्रकार परिषदेत शहरातील उड्डाण पुलासाठी २९९ कोटींचा निधी देण्याचे, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ३०० कोटी देण्याचे आश्‍वासन मात्र त्यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...