agriculture news in Marathi, Chief Minister Fadnvis, Maharashtra gave 20 crore to Kerla, Maharashtra | Agrowon

केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून, त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून, त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून, पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून २० कोटींचे अर्थसाह्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. राज्य शासन केरळ सरकारशी कालपासून सातत्याने संपर्कात असून, त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येत आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाच्या पुढाकाराने राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यात एका विशेष पथकाची नियुक्ती करून त्यावर याबाबतच्या समन्वय आणि कार्यवाहीची जबाबदारी सोपव‍ण्यात आली आहे. 

केरळ पूरग्रस्तांसाठी अन्नाचा पुरवठा ही प्राधान्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध सामाजिक, स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्थांशी राज्य शासनाने समन्वय साधत अन्नपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. एमसीएचआय-क्रेडाई या संघटनेतर्फे दीड कोटी रुपये किमतीचे अन्न उपलब्ध करून देण्यात येत आहे. राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनकडून ५१ लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन अन्न उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यापैकी ६ टन अन्नपुरवठा शनिवारी सायंकाळपर्यंत रवाना होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...