agriculture news in marathi, chief minister Fadnvis says E-nam portal for farmers welfare, Maharashtra | Agrowon

ई-नाम पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे : मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार समितीमार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १२) काढले. 

राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ई-नाम हे राष्ट्रीय स्तरावरील वेब पोर्टल असून त्याद्वारे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत माहिती एकत्रित ठेवण्यात येते. या पोर्टलसंदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

मुंबई : राष्ट्रीय कृषी बाजार समितीमार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे उद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १२) काढले. 

राष्ट्रीय कृषी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ई-नाम हे राष्ट्रीय स्तरावरील वेब पोर्टल असून त्याद्वारे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत माहिती एकत्रित ठेवण्यात येते. या पोर्टलसंदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री म्हणाले, की या पोर्टलसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी मध्यस्थांची भूमिका बजावून देशातील उत्तम बाजारपेठ तयार करण्यास मदत करावी. कर्जमाफीसाठी एकत्रित केलेली शेतकरी आणि त्यांच्या बॅंक खात्यांची माहिती, तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून या पोर्टलसोबत लिंक करून मास्टर डाटा तयार ठेवावा. 

पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील सर्व कृषी व्यापारी व शेतकऱ्यांनी यात आपला सहभाग वाढविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कृषी आणि पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार म्हणाले, की या पोर्टलमुळे व्यवहारात पारदर्शकता आली असून, शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. आतापर्यंत १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली असून, पहिल्या टप्प्यात ४५ बाजार समित्यांची नोंदणी झाली आहे. लवकरच ६० समित्यांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. या पोर्टलवरून व्यवहार करण्यासाठी आनलाइन व्यवहाराचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत.

या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास, पणन संचालक डॉ. अनंत जोग, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सुमंत चौधरी, डॉ. अरुण कुलकर्णी, बाजार समित्यांचे सचिव आणि सभापती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...