agriculture news in Marathi, chief minister says, drought like condition declare soon, Maharashtra | Agrowon

दुष्काळसदृश परिस्थिती लवकरच जाहीर करणार ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मुंबई ः राज्यातील टंचाईग्रस्त भागात लवकरच दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाईल. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण तयारी केली आहे. तसेच स्वतः मंत्री प्रत्येक दुष्काळी तालुक्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांची पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) दिली. राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुंबई ः राज्यातील टंचाईग्रस्त भागात लवकरच दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाईल. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण तयारी केली आहे. तसेच स्वतः मंत्री प्रत्येक दुष्काळी तालुक्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांची पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) दिली. राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ७७ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. काही भागात पावसाने मोठी उघडीप दिली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोण-कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याचा सविस्तर आढावा मंत्री परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या दुष्काळी मॅन्युअल २०१६ मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने टप्प्यांची माहिती दिली आहे. त्यासाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार हे मोजमापाचे काम आधीपासूनच सुरू करण्यात आले आहे.

ठरलेल्या वेळेत हे काम पूर्ण होऊन प्रक्रियेला विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर टंचाईग्रस्त भागात लवकरच दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाईल. तसेच उपाययोजनाही लागू केल्या जातील. सध्या यासंदर्भातील माहितीचे विश्लेषण युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारचे पथक राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर येईल. त्यासोबतच दुष्काळाचे उर्वरित टप्पेही पूर्ण केले जातील. 

या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.

दुष्काळी स्थितीचे नियोजन
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आदी प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाने सर्व मंत्री, राज्यमंत्री या सर्वांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी दुष्काळी जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थितीची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन दुष्काळाची तीव्रता, लोकांच्या अडचणी समजावून घ्याव्यात. त्यामुळे स्थानिक यंत्रणाही जलदगतीने काम करेल तसेच त्यांच्यावर काऊंटर चेकही राहिल. यासंदर्भातील एक कार्यक्रम निश्चित करून मंत्र्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
 

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...