मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : मुख्यमंत्री

मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : मुख्यमंत्री
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : मुख्यमंत्री

औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असून मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सोमवारी (ता. १७) महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मराठवाडा विकास महामंडळाचे भागवत कराड, महिला आयोगाच्या विजया रहाटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी उदय चौधरी, वर्षा ठाकूर, संजीव जाधवर, रिता मैत्रेवार, सरीता सुत्रावे, मृणालिनी निंबाळकर आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मराठवाड्याने जशी निजामापासून मुक्ती मिळवली, तशीच आता आपल्याला मागासलेपणातुन मुक्ती हवी आहे. विकासासाठी भुकेल्या या प्रदेशात समृद्धी, विकास करायचा आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा महत्त्वाचा यासाठी की त्यामुळेच भारत एकसंघ राहू शकला. भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा मराठवाड्याने महाराष्ट्रात राहणे पसंत केले. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

मराठवाड्यात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील सर्वात मोठी वॉटर ग्रीड मराठवाड्यात होत आहे. १४ प्रकल्पांचे पाणी शेती, उद्योग आणि पिण्यासाठी या विभागाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ऑरीक सिटीमध्ये ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून या माध्यमातून ३ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना मुक्‍तिसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. डॉ. भापकर लिखित मराठवाडा अग्रेसर या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com