agriculture news in Marathi, Chief minister says horse Museum will be the attraction, Maharashtra | Agrowon

अश्‍व संग्रहालय आकर्षण ठरणार ः मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

सारंगखेडा, जि. नंदुरबार : अश्‍व संग्रहालय जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरावे, यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे. येत्या तीन वर्षांत ही यात्रा आणि चेतक महोत्सव जागतिक पातळीवर पोचून विदेशातील पर्यटक येथे येतील. या भागातील प्रकाशा, तोरणमाळच्या विकासासाठी १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून या भागाला रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

सारंगखेडा, जि. नंदुरबार : अश्‍व संग्रहालय जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरावे, यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे. येत्या तीन वर्षांत ही यात्रा आणि चेतक महोत्सव जागतिक पातळीवर पोचून विदेशातील पर्यटक येथे येतील. या भागातील प्रकाशा, तोरणमाळच्या विकासासाठी १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून या भागाला रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

येथे अश्‍वसंग्रहालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ८) झाले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार विजयकुमार गावित, खासदार हीना गावित, प्रधान सचिव नितीन गर्दे, आयुक्त महेश झगडे, महानिरीक्षक विनय चौबे, पर्यटन विभागाचे संचालक विजय वाघमारे, आशुतोष राठोड, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक संजय पाटील, स्वाती पाटील, रेखा चौधरी, जिल्हा परिषद सदस्य जयपाल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्‍वर्या रावल, सरपंच भारती कोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. मोहन उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की येथे अश्‍वांची माहिती देणारे अतिशय सुंदर चित्रप्रदर्शन आहे. सारंगखेड्याला अश्‍व संग्रहालय तयार करा असे सुचवले होते. त्याचे भूमिपूजन आज केले. देशातील सर्वांत सुंदर संग्रहालय व्हावे, ते जगाचे आकर्षण होईल असे करण्यात येईल. ब्रिडिंग दवाखान्याची सोय व्हावी, अशी मागणी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने ते काम करण्यात येईल. जगात सर्वाधिक रोजगार पर्यटनातून तयार होतो. या महिनाभरात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत. कच्छच्या रण उत्सवाप्रमाणे तीन वर्षांत चेतक महोत्सव जागतिक स्तरावर गेलेला असेल. पुढच्या वर्षी जपानसह अन्य देशांतील पर्यटक विमानातून येथे येतील. 

पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले, ‘‘दत्त यात्रा, युद्धासाठीचे घोडे देश-विदेशांतून येतात. आदिवासींची संस्कृती आहे. या तिघांचा संगम आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी धुळे येथे प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...