agriculture news in marathi, chief minister says, reservation will gave within 15 days, Maharashtra | Agrowon

मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष करायचा ः देवेंद्र फडणवीस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली. आता अरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, मागासवर्ग आयोगानेही अहवाल सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय मार्गी लागेल. आता लढा नाही जल्लोष करायचा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १५) केले. 
 

नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली. आता अरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, मागासवर्ग आयोगानेही अहवाल सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय मार्गी लागेल. आता लढा नाही जल्लोष करायचा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १५) केले. 
 

शेतकरी मराठा महासंघ व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नगर शाखेतर्फे शनिशिंगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) येथे गुरुवारी शेतकरी वारकरी महासंमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे होते.  महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, संमेलनाचे आयोजक व शेतकरी-मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर कदम, माजीमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी संभाजी दहातोंडे यांनी प्रास्ताविक करून शेतकरीआत्महत्या  थाबण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पुरस्काराने गौरव
शेतकरी मराठा महासंघ व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नगर शाखेतर्फे दरवर्षी समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यंदा शनिशिंगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) येथे झालेल्या शेतकरी वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार सी. आर. पाटील, डॉ. रंजना बेल्हेकर, समाजभूषण कृषी पुरस्कार श्रीधर ठाकरे, (स्व.) बाबूराव बानकर, तर समाजभूषण पुरस्कार नारायणराव डौले यांना देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वरूप पुढील वर्षापासून वाढ केली जाणार असल्याचे या वेळी संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. 

प्रसंगी कर्ज घेऊ
राज्यात काही भागांत दुष्काळाचे संकट असले तरी गेल्या चार वर्षांपासून जलसंधारणाच्या केलेल्या कामामुळे राज्याला फायदा झाला आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी कर्ज घेण्याची वेळ आली तरी घेऊ, पण शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम सुरूच राहील. गेल्या चार वर्षांत सरकारने शेती आणि शेतकरी समोर ठेवूनच काम केले आहे, असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...