मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात अकोल्यातील १५ शेतकऱ्यांचा सहभाग

मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात अकोल्यातील १५ शेतकऱ्यांचा सहभाग
मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात अकोल्यातील १५ शेतकऱ्यांचा सहभाग

अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १४) ‘लोकसंवाद’ कार्यक्रम घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ शेतकरी सहभागी झाले.   

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉलिहाउस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने हा संवाद आयोजित केला होता. 

जिल्ह्यातील प्रवीण दांदळे (खिरपुरी), वर्षा ठाकरे (कान्हेरी सरप), विनोद भटकर (पाटखेड), उमेश फुलारी (पातूर), शंकरराव लहामगे (अालेगाव), पुरुषोत्तम चतरकर (कापशी रोड), महेंद्र चक्रनारायण (अकोला), महेंद्र काळे (सांगळूद), भीमराव सदाशीव (यावलखेड), प्रवीण खोत (समशेरपूर), विठ्ठल वाकोडे (जामठी खुर्द), दिलीप गावंडे (नेव्हरी), सतीश बोंद्रे (शिवापूर), सत्यनारायण म्हसाये (वारखेड), दिनेश देवकर (तळेगाव बुद्रुक) अादी शेतकऱ्यासंह कृषी विभाग, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com