केरळला २६०० कोटींचे पॅकेज द्या : मुख्यमंत्री विजयन

अलाप्पुझा (केरळ) येथे पाऊस कमी झाला असला, तरीही पुराचे पाणी कमी झाले नाही. (दुसऱ्या छायाचित्रात) कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यात जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील चिखल काढण्याचे काम सुरू आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अलाप्पुझा (केरळ) येथे पाऊस कमी झाला असला, तरीही पुराचे पाणी कमी झाले नाही. (दुसऱ्या छायाचित्रात) कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यात जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील चिखल काढण्याचे काम सुरू आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तिरुअनंतपूरम ः पुरामुळे केरळचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्याला दोन हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी राज्य सरकारने आज केंद्राला केली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत राज्यातील पूरबळींची संख्या ३७३ वर पोचली असून, सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना मदत छावण्यांचा आसरा घ्यावा लागला आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२१) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. केंद्र सरकारकडून प्रायोजित करण्यात येणाऱ्या मनरेगासारख्या योजनांच्या माध्यमातून ही मदत दिली जावी, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शतकातील सर्वांत भीषण पुराचा सामना केरळ करीत असून, या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी केरळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी दिली.  पुरामुळे राज्याचे सुमारे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही वियजन यांनी सांगितले. केंद्राकडून केरळला आत्तापर्यंत ६८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील एकूण १४ पैकी १३ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणीची गरज असून, त्यासाठी खुल्या बाजारातून कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करण्याची विनंती राज्याने केंद्राकडे केली आहे, असेही विजयन यांनी सांगितले. 

‘यूएई' देणार ७०० कोटींची मदत  केरळमधील पुनर्बांधणीसाठी संयुक्त अबर अमिरातीकडून (यूएई) सुमारे ७०० कोटींची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले. अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, त्या वेळी केरळला मदत देण्याचे आश्वासन दिले असल्याचे विजयन म्हणाले. केरळमधील स्थिती...

  • केरळसमोर आता पुन्हा उभे रहाण्याचे आव्हान 
  • केरळमध्ये ३० मे पासून पाऊस, पूर आणि दरडी कोसळल्यामुळे ३७३ बळी 
  • पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी धावले प्राणीप्रेमी 
  • ओनम, बकरी ईदच्या सणांचा उत्साह पूरात गेला वाहून 
  • पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द 
  • जगभरातून मदतीचा ओघ सुरू, यूएईकडून ७०० कोटींची मदत 
  • संकटात असलेल्या केरळी जनतेसाठी जगभरातून मदतीचा ओघ वाढला 
  • केरळातील मागील अनेक दशकांतील सर्वांत भीषण पूर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com