agriculture news in Marathi, Chili production down in Nandurbar District, Maharashtra | Agrowon

मिरची आगाराला लागली घरघर
चंद्रकांत जाधव
रविवार, 28 जानेवारी 2018

नंदुरबार ः खानदेशी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा कीड-रोग व इतर कारणांमुळे उत्पादनात निम्म्याने घट आली आहे. मिरचीचा तुटवडा जाणवत असून, दरात काहीशी वाढ झाली आहे. परंतु उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत असून, किरकोळ नफ्यावर यंदा मिरचीचे दहा महिन्यांचे पीक घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

नंदुरबार ः खानदेशी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा कीड-रोग व इतर कारणांमुळे उत्पादनात निम्म्याने घट आली आहे. मिरचीचा तुटवडा जाणवत असून, दरात काहीशी वाढ झाली आहे. परंतु उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत असून, किरकोळ नफ्यावर यंदा मिरचीचे दहा महिन्यांचे पीक घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

जिल्ह्यात नंदुरबार तालुक्‍यात दरवर्षी सर्वाधिक ८०० ते १००० हेक्‍टरवर मिरचीची लागवड होते. त्यापाठोपाठ शहादा तालुक्‍यात ६० ते ७० हेक्‍टर आणि तळोदा तालुक्‍यातही २० ते २५ हेक्‍टर लागवड असते. यंदा एकूण ११०० हेक्‍टरवर लागवड झाली होती. नंदुरबार तालुक्‍यात कोठली, बामडोद, पिंपळोद आदी भागात तर शहादा येथे कहाटूळ, जयनगर, बामखेडा भागात किरकोळ स्वरूपात लागवड झाली होती. 

विषाणूजन्य रोगांचा फटका मिरचीची लागवड जून व जुलैमध्ये झाली. मार्चपर्यंत पीक घेतले जाते. परंतु यंदा सप्टेबर, ऑक्‍टोबरमध्ये एवढे विषाणूजन्य रोग वाढले की, अनेक शेतकऱ्यांना वाढता उत्पादन खर्च आणि असमाधानकारक पीक यामुळे पीक उपटून क्षेत्र रिकामे करावे लागले. सुमारे ५०० ते ६०० हेक्‍टरवरील पीक उपटून क्षेत्र रिकामे झाल्याची माहिती आहे. 

दरवाढीचा दिलासा
मिरचीला एकरी किमान ५० ते ६० हजार रुपये खर्च आला आहे. १० महिन्यांचे हे पीक असून, यंदा तोडेही उशिरा सुरू झाले. सध्या तोडे सुरू आहेत, मार्चपर्यंत एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन येईल. खर्च वगळता ३० हजार रुपये नफा एकरी सुटू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

पथाऱ्यांना सुरवात
नंदुरबारची मिरची मुंबईपर्यंत प्रसिद्ध आहे. मिरची खरेदी करून व्यापारी मंडळी नंदुरबार शहरात धुळे चौफुलीपुढील शहादा बायपासनजीक पथाऱ्या करून वाळवून घेतात. एप्रिल महिन्यापर्यंत पथाऱ्या राहतील. सुमारे १५ व्यापाऱ्यांनी पथाऱ्या बनविल्या असून, खासगी बाजारात कोरड्या मिरचीला १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर हिरव्या मिरचीची किरकोळ दरवाढ झाली असून, २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

मिरचीचे उत्पादन व स्थिती दृष्टिक्षेपात

मिरचीचे सुरवातीचे क्षेत्र  ११०० हेक्‍टर
प्रादुर्भावामुळे रिकामे झालेले क्षेत्र  ६०० हेक्‍टर
अपेक्षित उत्पादन  १५० क्विंटल एकरी 
हाती येणारे उत्पादन   ८० ते ८५ क्विंटल एकरी
उत्पादनातील तूट  एकरी ५० क्विंटल किमान
एकरी सुटणारा नफा  फक्त ३० हजार

 

इतर अॅग्रो विशेष
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...
माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थितीपुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल...
राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या...
धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहितीकऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा...
साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची...कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...
‘ई-नाम’ची व्याप्ती सर्वांच्या...स्पर्धाक्षम, पारदर्शक व्यवहारातून शेतीमालास अधिक...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...
हास्य योगाद्वारे सरकारचा निषेधनागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...