agriculture news in marathi, China to purchase soyacake from maharashtra | Agrowon

महाराष्ट्रातील सोयाबीन पेंड खरेदीसाठी चीनचा पुढाकार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कॅान्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता.१०) रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 

मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कॅान्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता.१०) रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. 

शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सूक असल्याचे यावेळी टॅन्ग गुओकाई यांनी सांगितले. चीनसमवेत देवाण-घेवाण अधिक विकसित करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चीनने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळणार आहे. 

राज्य कृषिमूल्य आयोग आणि बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रथमच पुढाकार घेतल्याचे दिसले. या वेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. शिवाय राज्यात सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगही विकसित असल्याने चीन देशाला मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेंडचा पुरवठा करता येऊ शकेल. केंद्र शासनानेही या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सोयाबीन पेंडला १० टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे. यामुळे सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने दाखविलेल्या उत्साहामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल.  पाशा पटेल म्हणाले, की चीन ही महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ ठरू शकेल. 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...