होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज

सरकीमधील जनुकाला (जीन) ‘सायलेन्ट’ करण्यास यश आले आहे. परिणामी अशा सरकीपासून निर्माण केले जाणारे खाद्यपदार्थ त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने मानवास लाभदायक ठरतील. तसेच ‘झिरो हंगर’ आणि कुपोषणाशी लढण्यासही याची मदत होणार असून, शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. - डॉ. केशव क्रांती, कापूसतज्ज्ञ व माजी प्रमुख सीआयसीआर (सध्या अमेरिकेत आहेत)
सरकी, चाॅकलेट, कुकीज
सरकी, चाॅकलेट, कुकीज

नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली सामान्य माहिती. परंतु, सरकीपासून लवकरच चॉकलेट, कुकीजसह नानाविध खाद्यपदार्थ तयार केले जातील. यामुळे मोठा कापूस उत्पादक भाग असलेल्या वैदर्भीय शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी मार्ग मिळणे सुकर होणार, असे मानले जात आहे.  मूळ भारतीय आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. कीर्ती राठोड ‘एडिबल कॉटन’वर गेल्या २३ वर्षांपासून संशोधन करीत आहेत. त्यांच्या प्रयोगाला अखेर यश आले असून, अमेरिकेच्या कृषी विभागाकडे (यूएसडीए) त्यांनी  मंजुरीसाठी अर्ज पाठविला आहे. एक ते दोन महिन्यांत या प्रयोगाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. संशोधनाला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकरी खाद्यान्न तसेच फायबरसाठी कापूस लागवड करू शकतील.  जनुकांना केले ‘सायलेंट’  कापसामध्ये ‘गॉसीपॉल’ असते. ‘गॉसीपॉल’मुळे कापसाच्या बिया आणि पानांवर संरक्षणात्मक थर तयार होतो. हा थर कीटक आणि किडींपासून पिकांचा बचाव करीत असतो. यामुळे सरकी माणसांसाठी खाण्यायोग्य ठरत नाही. नवीन संशोधन आणि प्रयोगानुसार सरकीमधील जनुके जी या घटकांची निर्मिती करतात त्यांना ९० टक्के ‘सायलेन्ट’ करण्यात यश आले आहे. परिणामी सरकीपासून तयार होणारे खाद्यपदार्थ मानवासाठी खाण्यायोग्य ठरणार आहेत.  पोषणमूल्याने भरपूर  महाराष्ट्रासह भारत आणि जगभरात कुपोषणाची मोठी समस्या आहे. ‘एडिबल कॉटन’पासून तयार होणारी सरकी ही प्रथिनांच्या बाबतीत भुईमुगाच्या समतुल्य राहील. अनेक प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगात या प्रथिनांचा वापर करून पोषणमूल्य पदार्थ तयार करता येणे शक्‍य आहे. असे झाल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना कापसासह ‘एडिबल कॉटन’ची सरकी निर्यात करता येईल. शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी  ‘एडिबल कॉटन’पासून पोल्ट्रीसाठी, मत्स्यशेतीसाठी तसेच वराहपालनसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपुरवठा शक्‍य आहे. तसेच सरकीच्या भुकटीचा चॉकलेटसह काही स्नॅक्‍समध्येही वापर शक्‍य आहे. कापूस उत्पादकांसाठी यामुळे उत्पादनवाढीचे आणि उत्पन्नवाढीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल, असा राठोड यांना विश्‍वास आहे. ‘एडिबल कॉटन’पासून पोल्ट्रीसाठी, मत्स्यशेतीसाठी तसेच वराहपालनसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपुरवठा शक्‍य आहे. तसेच सरकीच्या भुकटीचा चॉकलेटसह काही स्नॅक्‍समध्येही वापर शक्‍य आहे. कापूस उत्पादकांसाठी यामुळे उत्पादनवाढीचे आणि उत्पन्नवाढीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल, असा राठोड यांना विश्‍वास आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com