agriculture news in marathi, The choice of farmer companies for purchase in a mortgage | Agrowon

हमीभावात खरेदीसाठी शेतकरी कंपन्यांचा पर्याय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

बुलडाणा : मागील हंगामात मूग, उडीद, सोयाबीन, तूर खरेदीमध्ये अनियमितता झालेल्या केंद्रावरील संचालक संस्थांना काळ्या यादीत टाकले. त्यानंतर तेथे पर्याय म्हणून मूग, उडीद खरेदीची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपन्यांवर सोपविली अाहे. पर्यायासाठी प्रस्तावच न आलेल्या केंद्राबाबत काही अटी शिथिल करून पुन्हा एकदा जुन्याच संस्थेबाबत विचार केला जात असल्याचे समजते.

बुलडाणा : मागील हंगामात मूग, उडीद, सोयाबीन, तूर खरेदीमध्ये अनियमितता झालेल्या केंद्रावरील संचालक संस्थांना काळ्या यादीत टाकले. त्यानंतर तेथे पर्याय म्हणून मूग, उडीद खरेदीची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपन्यांवर सोपविली अाहे. पर्यायासाठी प्रस्तावच न आलेल्या केंद्राबाबत काही अटी शिथिल करून पुन्हा एकदा जुन्याच संस्थेबाबत विचार केला जात असल्याचे समजते.

या हंगामाला सुरवात करण्यापूर्वी शासनाने कडक धोरण अवलंबून मागील हंगामात अनियमितता झालेल्या खरेदी केंद्रावरील केंद्रचालक संस्थांना या वेळी डच्चू दिला आहे. शिवाय संबंधित खरेदीदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात अाले. यामुळे अशा संस्थांचा यंदा खरेदी प्रक्रियेत सहभाग राहणार नाही. त्यांना पर्याय म्हणून इतर संस्था, शेतकरी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

जिल्ह्यात मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, संग्रामपूर अाणि शेगाव या पाच ठिकाणच्या संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे. या हंगामात खरेदीसाठी पर्यायी अर्ज यंत्रणांकडून मागविण्यात अाले. संग्रामपूर वगळता इतर ठिकाणांसाठी अर्ज अाले. त्यामुळे तेथील खरेदीचा मार्ग मोकळा झाला. ही स्थिती लक्षात घेऊन या केंद्राबाबत वेगळा विचार सुरू असून, नियम थोडे शिथिल करून सुधारित प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जाणार अाहे. याला मंजुरी मिळाली तर हे केंद्रसुद्धा तातडीने सुरू होण्याची शक्यता आहे.

आॅनलाइन नोंदणीत २४५०० शेतकरी 

मूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी अाॅनलाइन नोंदणी करण्याचे अावाहन शासनाने केले अाहे. यानुसार जिल्ह्यात अातापर्यंत राज्य मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनकडे ही नोंदणी झाली अाहे. अाॅनलाइन नोंदणीला शासनाने पुन्हा एकदा १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...