agriculture news in marathi, choice of foreign entrepreneurs is Maharashtra: Chief Minister | Agrowon

परकी उद्योजकांची पसंती महाराष्ट्रालाच : मुख्यमंत्री
सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जानेवारी 2018

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्यानेच परकी उद्योजक गुंतवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्रालाच देतात. राज्यात उद्योगांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने एमएमआरडीए येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पहिली ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८’ ही जागतिक गुंतवणूक परिषद होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्यानेच परकी उद्योजक गुंतवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्रालाच देतात. राज्यात उद्योगांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यात गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने एमएमआरडीए येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पहिली ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८’ ही जागतिक गुंतवणूक परिषद होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक उत्पादनाला चालना आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद होत आहे. राज्याने तीन वर्षांत औद्यागिक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आपला घसरलेला क्रमांक सुधारला असून राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. देशाच्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे निम्मी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. पायाभूत सुविधा, निर्यात आणि वित्त क्षेत्रातही राज्य कायम आघाडीवर आहे. १० वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था तीन दशलक्ष डॉलरपर्यंत पोचेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील नवोदित आणि तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्टअप अंडर ३०’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी घोषणा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

७४ टक्के रोजगार निर्माण
सर्व विभागांच्या तुलनेत उद्योग विभागाची प्रगती २० टक्‍क्‍यांनी अधिक आहे. राज्यात २०१६ला ‘मेक इन महाराष्ट्र’ परिषद झाली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. यात २० हजार ९८४ सामंजस्य करार करण्यात आले. त्यातील ५२ टक्के प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. प्रस्तावित गुंतवणुकीच्या ६१ टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. यातून अपेक्षित असलेल्या २२ लाख रोजगारनिर्मितीपैकी सुमारे ७४ टक्के रोजगार निर्माण झाले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...