agriculture news in marathi, choose pro farmer government, appeals pawar | Agrowon

शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडा : पवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे लोकशाही टिकून आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एकही औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही भूमिका न घेता या सरकारला खाणाऱ्याची काळजी असल्याचे दिसून येते. शेती व शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडून आणा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे लोकशाही टिकून आहे. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात एकही औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही भूमिका न घेता या सरकारला खाणाऱ्याची काळजी असल्याचे दिसून येते. शेती व शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार निवडून आणा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीसह मित्र पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटणमधील जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘आमच्या हातात राज्य असताना पशुधन वाचविले. मात्र, आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत नाही. दुष्काळाशी सामना करताना काय तयारी करावी लागते, याची जाणीव नसल्याने राज्यकर्ते गोंधळून गेले आहेत. तथापि सत्तेत असताना युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही उद्योग सुरू केले; पण आजची स्थिती पाहता मोदींच्या काळात एकही औद्योगिक वसाहत सुरू झाली नाही. युवकांना नवीन नोकऱ्या नाहीत, हे वास्तव आहे. शेती पिकविण्यासाठी भांडवल लागते; पण थकबाकी हीच मोठी चिंता आहे. पंतप्रधान मोदी यांनी अकलूजच्या सभेत दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, उद्योगधंद्याबाबत एक शब्दही न बोलता माझ्याबाबत बोलत राहिले.’’

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचारादरम्यान अफवा पसरवल्या जात आहेत. त्याला खतपाणी न घालता भाजपचा उमेदवार माझा पुतण्या नाही हे वास्तव आहे. त्यातच यांचे वडील हिंदूराव नाईक- निंबाळकर १९९६ ला आमच्या चुकीमुळे खासदार झाले. विकृत विचारसरणीच्या या उमेदवाराला २००९ मध्ये ताकद दिली नसती, तर स्वराज दुधाचे ३/१३ वाजले असते. अशा स्थितीत हाच माणूस आम्हाला विरोध करतो तेव्हा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. या माणसाच्या दूध डेअरीवर ३२० कोटी रुपये इतके कर्ज आहे.’’  

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...