Agriculture news in marathi; In Chopda, Amalner Bazar committees, the nominal arrivals of every person | Agrowon

चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची नगण्य आवक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जून 2019

जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर स्थिर असून, चोपडा, अमळनेर या आघाडीच्या बाजार समित्यांमध्येही नगण्य आवक होत आहे. देशी हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४३५० रुपये आणि काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. या दोन्ही प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात मागील ८- १० दिवसांत क्विंटलमागे फारशी सुधारणा झालेली नाही. 

जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर स्थिर असून, चोपडा, अमळनेर या आघाडीच्या बाजार समित्यांमध्येही नगण्य आवक होत आहे. देशी हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४३५० रुपये आणि काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. या दोन्ही प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात मागील ८- १० दिवसांत क्विंटलमागे फारशी सुधारणा झालेली नाही. 

शासकीय खरेदी बंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ११ केंद्रात खरेदी सुरू होती. परंतु, या केंद्रात आवक हवी तशी नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी मार्चमध्येच हरभऱ्याची विक्री केली आहे. मार्चमध्ये दर ३७०० ते ४१०० रुपये असे होते. काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल कमाल ६००० रुपये दर होते. परंतु मे महिन्याच्या मध्यानंतर दर स्थिरावले व सरत्या आठवड्यात दरात सुधारणा झाली आहे. दर स्थिर असले तरी चोपडा व अमळनेर बाजारात मिळून प्रतिदिन २०० क्विंटलदेखील हरभऱ्याची आवक होत नसल्याची स्थिती आहे. कारण, शेतकऱ्यांकडे हरभरा नाही. सध्या मोठ्या बाजार समित्यांमधील खरेदीदार व व्यापारी, यांच्यात हरभऱ्याचे व्यवहार सुरू आहेत. तर मुक्ताईनगर येथेही मागील आठवड्यात हरभऱ्याची फारशी आवक झाली नाही. 

काबुली हरभऱ्याचीदेखील शून्य आवक
काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. या हरभऱ्याचीदेखील चोपडा, अमळनेर बाजारात सध्या आवक सुरू नाही. शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारातून व्यापारी त्याची इंदूर, बडवानी (मध्य प्रदेश), बडोदा, सुरत (गुजरात) येथील खरेदीदारांना विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली. 

इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत गवार १५०० ते ५००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ३०० ते १७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ३०० ते १४०० रुपये...
चोपडा, अमळनेर बाजार समित्यांमध्ये...जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर...
जळगावात लाल कांद्याच्या दरांवर पुन्हा...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२००...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या...