agriculture news in marathi, chopda and jalgao in banana | Agrowon

चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढला
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात क्विंटलमागे ३० रुपये दरवाढ झाली. बॉक्‍स पॅकिंगच्या केळीला ऑनचे दरही मिळत आहेत. जुनारी बागांमधील केळी संपण्याची स्थिती आहे. रावेरात केळीला १०४० तर जळगावात ९९० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.

जळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात क्विंटलमागे ३० रुपये दरवाढ झाली. बॉक्‍स पॅकिंगच्या केळीला ऑनचे दरही मिळत आहेत. जुनारी बागांमधील केळी संपण्याची स्थिती आहे. रावेरात केळीला १०४० तर जळगावात ९९० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.

२७ ते ३० किलो रासच्या केळीची बॉक्‍समध्ये पॅकिंग करून ती उत्तर भारतात पाठविली जात आहे. सध्या जळगाव, चोपडा भागात केळी अधिक उपलब्ध होत असून, अर्ली कांदेबागांमधून केळीचा पुरवठा वाढला आहे. जळगाव व चोपडा भागातील तापी व अनेर नदीच्या काठानजीकच्या भागात चांगला पुरवठा सुरू आहे. याच भागातून केळीची उत्तर भारतात पाठवणूक होत आहे. प्रतिदिन १०० ते १२० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक या भागात सुरू आहे.

सध्या उत्तर भारत व आंध्र प्रदेशातील केळी कापणी सुरू नसल्याने जळगाव व चोपडा भागातील दर्जेदार केळीला चांगला उठाव आहे. परंतु, पुढील महिन्यात उत्तर व मध्य भारतात केळीची कापणी सुरू होईल. आंध्र प्रदेशातूनही पुरवठा सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

यावल व रावेरात केळीचा पुरवठा कमी आहे. फक्त मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या केळीची कापणी तांदलवाडी, निंबोल, वाघोदा भागात सुरू आहे. जुनारी केळी बागांची कापणी जवळपास आटोपली आहे. पिलबागांमधूनही केळीची आवक कमी आहे. पिलबागांमधील केळीला प्रतिक्विंटल ८७० रुपये प्रतिक्विंटलचा दर रावेर भागात मिळाला. जळगाव, चोपडा, जामनेर भागात पिलबाग केळीचा पुरवठा शून्य टक्के असल्याचे सांगण्यात आले.

यावल, रावेर भागात प्रतिदिन २०० ट्रक केळी उपलब्ध होत आहे. मुक्ताईनगरमधील तापी काठावरील भागात पिलबाग व जुनारी बागांमधून केळी फारशी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. उत्तर भारतात श्रावणमासानिमित्त केळीची मागणी कायम होती. तेथे २० रोजी शेवटचा श्रावण सोमवार होता. पण पश्‍चिम भागात महाराष्ट्र, गुजरातेत श्रावण मास अजून अर्धाअधिक राहिला आहे. त्यामुळे केळीची स्थानिक (लोकल) मागणी कायम राहणार आहे. ठाणे, कल्याण व मुंबई येथून ही मागणी कायम राहिली. काही खरेदीदारांनी घेतलेली जुनारी केळी उत्तर भागात पाठविण्यात आली, पण ती अपेक्षित स्थळी पोचेपर्यंत पिकल्याच्या तक्रारी आल्याने रावेर, यावल भागातील जुनारी केळीची पाठवणूक बाजार समित्यांमध्ये करावी लागली, असे सांगण्यात आले.

मध्य प्रदेशात कांद्याची पाठवणूक
जिल्ह्यातील जळगाव, चोपडा भागातील व्यापाऱ्यांनी कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेशात केली. तेथून मागील आठवड्यात मागणी वाढली. कांद्याची शेतकऱ्यांकडून कुठलीही आवक नाही. परंतु व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...