साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी तेजीत
साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी तेजीत

साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी तेजीत

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१९) ढोबळी, फ्लॉवर, मेथीचे दर तेजीत असून दोडका, टोमॅटो, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली. ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २५० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारसमितीत फ्लॉवरची २९ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला १०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. गवारीची १२ क्विंटल आवक झाली. गवारीस ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. पावट्याची नऊ क्विंटल आवक झाली. पावट्यास ५५० ते ६५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. शेवग्याची १५ क्विंटल आवक झाली. शेवग्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली. भेंडीस २०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांची २२ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना २०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.

हिरवी मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस २०० ते ३०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. वांग्याची १४ क्विंटल आवक झाली. वांग्यास १५० ते २००रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. दोडका, टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. दोडक्‍याची दोन क्विंटल आवक झाली. दोडक्‍यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला. टोमॅटोची ७० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ६० ते १०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.

पालेभाज्यात मेथीचे दर तेजीत होते. कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली. मेथीची १२०० जुड्या आवक झाली.   मेथीस शेकड्यास १००० ते १४०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची २००० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com