agriculture news in marathi, chopped chilli, flower, fenugreek expensive in Satara | Agrowon

साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी तेजीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१९) ढोबळी, फ्लॉवर, मेथीचे दर तेजीत असून दोडका, टोमॅटो, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली. ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २५० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१९) ढोबळी, फ्लॉवर, मेथीचे दर तेजीत असून दोडका, टोमॅटो, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली. ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २५० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारसमितीत फ्लॉवरची २९ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला १०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. गवारीची १२ क्विंटल आवक झाली. गवारीस ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. पावट्याची नऊ क्विंटल आवक झाली. पावट्यास ५५० ते ६५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. शेवग्याची १५ क्विंटल आवक झाली. शेवग्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली. भेंडीस २०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांची २२ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना २०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.

हिरवी मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस २०० ते ३०० रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. वांग्याची १४ क्विंटल आवक झाली. वांग्यास १५० ते २००रुपये प्रतिदहाकिलो असा दर मिळाला. दोडका, टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. दोडक्‍याची दोन क्विंटल आवक झाली. दोडक्‍यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला. टोमॅटोची ७० क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ६० ते १०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.

पालेभाज्यात मेथीचे दर तेजीत होते. कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली.
मेथीची १२०० जुड्या आवक झाली.   मेथीस शेकड्यास १००० ते १४०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची २००० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला आहे.

 

इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांदा दरात सातत्याने...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून...
नाशिकला कांदा ४०० ते १४०० रुपयेनाशिक : देशभरातील बाजारातून उन्हाळ कांद्याला...
नागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर...नागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावमध्ये जांभूळ ६००० ते ८५०० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची, फ्लॉवर, मेथी...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी,...पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या...
सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्यमागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी...
जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटलजळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड...कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने...
कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक...नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३)...
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३०...पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर...
थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा,...ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या...
परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-...
सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९)...
वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स...गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा...
पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...