नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये

नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १८७५ ते २८१३ रुपये

नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३ क्विंटल झाली. तिला १८७५ ते २८१३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४१२ रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

फळभाज्यांमध्ये कारल्याची आवक ८६ क्विंटल झाली. त्याला ४०४१ ते ५८३३ दर प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ४५८३ मिळाला. वांग्याची आवक २२८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० होते. फ्लॉवरची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ५७१ ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५७ होता. कोबीची आवक ३९९ क्विंटल झाली. तिला ७५० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होता.

भोपळ्याची आवक ६९० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १३३३ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९०० होता. दोडक्याची आवक २८ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ५८३५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४७०८ होता. गिलक्याची आवक १९ क्विंटल झाली. त्यास १५८५ ते ३७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८७५ होता. भेंडीची आवक २८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० रुपये होता. गवारची आवक १७ क्विंटल होती. तिला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० होता. 

काकडीची आवक ७९० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ५०० ते १२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होता. लिंबूची आवक १६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होता. 

फळांमध्ये पेरूची आवक ६ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. डाळिंब आवक ११६५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते ६५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होता. मोसंबीची आवक ११५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. 

टरबूजाची आवक १००५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० होता. खरबूजाची आवक ११६४ क्विंटल झाली. त्यास ९०० ते २६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० होता. 

कांद्याची आवक ३४४४ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ९११ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० होता. बटाट्याची आवक १४५५ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १३५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता. लसणाची आवक १७३ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये असल्याची माहिती सूंत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com