agriculture news in marathi, 'Chowkidars' are for rich people : Priyanka Gandhi | Agrowon

शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे चौकीदार : प्रियांका गांधी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. चौकीदार हे शेतकऱ्याचे नाही तर श्रीमंतांचे असतात. असे असताना केंद्र सरकार उद्योगपती मित्रांसाठी हजारो-कोट्यवधी रुपये देत आहे,’’ अशी टिका कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथे केली. 

प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. चौकीदार हे शेतकऱ्याचे नाही तर श्रीमंतांचे असतात. असे असताना केंद्र सरकार उद्योगपती मित्रांसाठी हजारो-कोट्यवधी रुपये देत आहे,’’ अशी टिका कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी येथे केली. 

लोकसभेच्या रणधुमाळीला रंग चढत असून कॉंग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला सोमवार (ता.१८) पासून प्रारंभ झाला आहे. प्रयागराज येथे हनुमान मंदिरात दर्शन घेऊन संगम येथे पूजा केली. त्यानंतर क्रूझ बोटीतून प्रयागराजहून वाराणसीकडे त्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. बोटीतून दौरा सुरू करण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी दुमदुमा घाट येथे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "चौकीदार हे शेतकऱ्यांचे नाही तर श्रीमंतांचे असतात. राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी पिकांना हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आज देश आणि देशाची घटना संकटात आहे.’’

मोदींच्या मतदारसंघात... 
प्रयागराज ते वाराणसी हे शंभर किलोमीटरचे अंतर बोटीतून पार करण्यात येणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रियांका यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...